
निलेश लंके यांच्या कामाचे कौतुक करत शरद पवारांनी दिला निलेश लंके यांना मोलाचा सल्ला!
निलेश लंके यांच्या कामाचा आलेख चांगलाच वाढला आहे. त्यांच्या लोकांत मिसळण्याची, संवाद साधून त्यावर मार्ग काढण्याची सध्या महाराष्ट्रभर चर्चा आहे. कालच आ.निलेश लंके यांची आणि आ. निलेश लंके यांची भेट व सविस्तर चर्चा झाली. त्यांच्या कामाचा आवाका मोठा असल्याचे वेळोवेळी दिसून येत आहे.
त्यांच्या याच कामाची खा. शरद पवारांनी दखल घेतली आहे. स्वतः शरद पवार साहेब यांनी फोन करून “इतरांची काळजी घेताना स्वतः ची काळजी घे” असा प्रेमाचा आणि मायेचा सल्ला आ.निलेश लंके यांना दिला आहे. इतकेच नव्हे तर त्यांनी सध्याच्या परिस्थितीत जे काही काम केलं आहे त्याचे त्यांनी कौतुक केलं आहे. चांगल्या कामाचे कौतुक झाले पाहिजे त्यामुळं अजुन ऊर्जेने काम करण्यास बळ मिळते.
ऑक्सिजन निर्मिती सेंटर ला आ. निलेश लंके आणि आ. रोहित पवार यांची भेट खूपच वादळी ठरली. या भेटीच्या बाबतीत फारच वादळी चर्चा संपूर्ण राज्यभरात पाहायला मिळायचे दिसून येते आहे. कामाची माणसं सोबत असल्याचं पाहून सगळ्यांनाच दोघांचेही कौतुक वाटलं आहे. महाराष्ट्राच्या अपेक्षा चांगल्याच पैकी या तरुण आमदारांवर आहेत त्या दृष्टीने ते प्रयत्न करत आहेत ही जमेची बाजू आहे!