पूजा चव्हाणच्या वडिलांनी संजय राठोड यांच्याकडून ५ कोटी घेतले,पूजाच्या चुलत आजीचा आरोप

0

माजी वनमंत्री संजय राठोड यांनी पूजाचे वडील लहूचंद्र चव्हाण यांना पाच कोटी रुपये दिल्याचा दावा पुण्यात आत्महत्या केलेल्या टिकटॉक स्टार पूजा चव्हाण यांच्या चुलतआजी शांताबाई राठोड यांनी सोमवारी केला. त्याचबरोबर पूजाच्या वडिलांनी हे दावे त्यांना बदनाम करण्याचे षडयंत्र असल्याचे सांगितले.

त्याचवेळी पूजाचे वडील लहूचंद्र चव्हाण यांनी याबाबत स्पष्टीकरण देताना सांगितले की शांताबाईंच्या आरोपात काहीही तथ्य नाही. त्यांचा आरोप निराधार आहे. आम्ही आमच्या दु:खामध्ये दुखी आहोत. आरोप ऐकून त्रास होत आहे. बीडमध्ये चव्हाण म्हणाले की शांताबाईंशी माझे फार दूरचे नाते आहे. त्यांच्या पतीचा २५ वर्षांपूर्वी मृत्यू झाला,त्यानंतर आपण त्यांचे तोंड पाहिले नाही. ते कुठे राहतात? काय करता? आम्हाला हे माहित नाही.

पूजाच्या वडिलांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली लहुचंद्र चव्हाण म्हणाले की,शांताबाईच्या मुलीने दोन वर्षांपूर्वी आत्महत्या केली. परंतु त्यानी ही माहिती पोलिस ठाण्यातही दिली नाही. चव्हाण म्हणाले की, आम्ही रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली असून आपल्या कुटूंबाची बदनामी थांबविण्याची विनंती केली. चव्हाण म्हणाले की, मी मुख्यमंत्र्यांना सांगितले होते की संजय राठोड यांनी या प्रकरणात सत्यता उघड होईपर्यंत वनमंत्रीपदाचा राजीनामा देऊ नये. चव्हाण म्हणाले की, राठोड यांच्या राजीनाम्याने मला दु: ख झाले. राजीनाम्याचे नाव ऐकताच संपूर्ण बंजारा समाज अस्वस्थ झाला आहे.

दुसरीकडे सामाजिक कार्यकर्त्या तृप्ति देसाई यांनी म्हटले आहे की शांताबाईंचा पैशाचा आरोप गंभीर आहे. परळीत मी पूजाचे वडील आणि आईला भेटले, त्या लोकांवर खूप दबाव असल्याचे दिसते. म्हणूनच मी सीबीआय चौकशीची मागणी करते. शांताबाईंना भेटायला वेळ द्यावा अशी मी मुख्यमंत्र्यांना विनंती करते. जेणेकरून शांताबाई आपल्याकडे असलेले पुरावे पोलिसात सोपवू शकतील.
मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर राठोड हे माध्यमांपासून दूरच आहेत. सोमवारी राठोड यांना माध्यमांनि विचारले की तुम्ही यवतमाळाला जाणार का? त्याला उत्तर म्हणून राठोड म्हणाले की हे आता सर्व झाले आह,. मला मोकळा राहू द्या. राठोड म्हणाले की मी अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाग घेईन.

८ फेब्रुवारी रोजी बीड जिल्ह्यातील परळी येथे राहणारी पूजा चव्हाण हिने पुण्याच्या वानवडी परिसरातील इमारतीतून उडी मारून आत्महत्या केली. पूजाच्या निधनानंतर राठोड सोबत तिची अनेक छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली. मात्र, पूजाच्या कुटूंबावर कोणालाही संशय आला नाही. पोलिसही आत्महत्येचे प्रकरण मानत आहेत,प्रकरणाचा तपास सुरु आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.