पोलिसांचे काम जाणून घेण्यासाठी गृहमंत्र्यांचा एकाला फोन; पण तो निघाला राष्ट्रवादीचा कार्यकर्ता!

0

एखाद्या कंपनीकडून सेवा घेतल्यानंतर बहुतांशवेळा कंपनी ग्राहकाकडून फीडबॅक घेते.

कॉल करून माहिती घेतली जाते. मात्र आपलं डिपारमेंट आपलं प्रशासन नेमकं जनतेची सेवा कशी करत आहे याची माहिती महाराष्ट्रातील मंत्री महोदय घेतात. स्वतः महाराष्ट्राचे गृहमंत्री यांनी पोलिसांकडून दिल्या जाणाऱ्या वागणुकी बद्दल माहिती घेण्यासाठी एका व्यक्तीला फोन लावला आणि त्या व्यक्तीच्या व्यक्तीकडून कामकाजाबद्दल माहिती घेतली.

पण किस्सा असा झाला की ज्या व्यक्तीला फोन करण्यात आला ती व्यक्ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता निघाली. तुमचे पद सांगितल्यामुळे तुम्हाला पोलिसांकडून चांगली वागणूक दिली का? अशी मिश्किल टिप्पणी गृहमंत्र्यांनी फोन वरती केली.

पोलीस आयुक्तालयाशी संपर्क साधल्यानंतर नागरिकांना समाधानकारक सेवा दिली जाते का? त्यांना योग्य मदत केली जाते का? ते समाधानी आहेत का? याची तपासणी करण्याच्या हेतूने वळसे पाटील यांनी एका व्यक्तीला फोन लावला. रमेश राऊत असे त्यांचे नाव होते. पोलीस व्हेरीफिकेशसाठी मुंढवा पोलीस स्टेशनला गेलो होतो असे त्यांनी सांगितले. पोलिसांनी खूप चांगली सेवा दिली असल्याचे त्यांनी सांगताच तुमचे पद बघून चांगली वागणूक दिली का? अशी विचारणा करताच कार्यकर्ता हसला!

Leave A Reply

Your email address will not be published.