पंतप्रधान मोदींनी केला सुषमा स्वराज आणि अरूण जेटली यांचा छळ -उदयनिधी स्टॅलिन यांच वक्तव्य

0

सध्या राजकीय गरमागरमी सुरू असून तामिळनाडूतही निवडणुकीचे वारे वाहत आहे.ठिकठिकाणी सभा होत आहेत.दरम्यान द्रमुकचे प्रमुख एम के स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांनी एका सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टिकेचा घणाघात केला.”वैंकय्या नायडूंसारख्या ज्येष्ठ नेत्यांना भाजप डावलत आहेत,तसेच मी ई पलानी स्वामी नाही जो तुम्हाला घाबरून झुकेल.मी उदयनिधी स्टॅलिन आहे.”अस ते यावेळी म्हणाले.’इंडिया टुडे’ ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
दरम्यान भाजप व अण्णा द्रमुक युती तामिळनाडूत झाली असून द्रमुक व काँग्रेस युती झालेली आहे.उदयनिधी स्टॅलिन हे द्रमुकचे नेते आहेत.उदयनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टिका करताना म्हणाले, “सुषमा स्वराज नावाची एक व्यक्ती होती ती मोदींनी टाकलेल्या दबावामुळेच मृत्यू पावली, तसेच अरूण जेटली नावाचाही एक व्यक्ती होती तिचाही मोदींनी केलेल्या छळामुळे मृत्यू झाला.”मोदी एक हुकूमशहा असल्याच त्यांनी दर्शवून दिल.या सर्व वक्तव्याची माहिती मिळताच अरूण जेटली व सुषमा स्वराज यांच्या मुलींनी हे आरोप खोडून काढले आहेत.
सुषमा स्वराज यांची कन्या बासुंरी स्वराज यांनी ट्विट करत उदयनिधीना उत्तर दिल आहे.”उदयनिधी तुम्ही माझ्या आईचा वापर निवडणूक प्रचारात करू नका.तुमच वक्तव्य चुकीच आहे.तुमच्या विधानामुळे आम्ही दुखावले आहोत.आमच्या अडचणीच्या काळात पक्ष व पंतप्रधान नरेंद्र मोदी आमच्यासोबत होते.”अस त्यांनी स्पष्ट केल.तसेच अरूण जेटली यांची मुलगी सोनाली जेटली बक्षी यांनीही ट्विट करत उदयनिधी स्टॅलिन यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.”उदयनिधी स्टॅलिन तुम्ही माझ्या वडिलांच्या आठवणींचा अनादर केल्यास मी शांत बसणार नाही.पंतप्रधान मोदी आणि जेटली यांचे राजकारणापलिकडे मैत्रीचे संबंध होते, असेही त्या म्हणाल्या.दरम्यान सुषमा स्वराज यांचा मृत्यू 6आॅगस्ट 2019 रोजी झाला तर अरूण जेटली यांनी 24 आॅगस्ट 2019ला अखेरचा श्वास घेतला.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.