
तैवान पिंक पेरू पिकवून नगर जिल्ह्यातील या पठ्ठ्याने करून दाखवल १४ महिन्यात घेतल ४० लाखाच उत्पन्न, वाचा कशी केली लागवड
भारत हा कृषिप्रधान देश आहे. आजही देशातील काही राज्य शेतीवरील उत्पन्नावर अवलंबून आहेत. बंगाल हे त्यातील प्रमुख राज्य असून बंगालमधील ७० टक्के जनता शेतीवर अवलंबून आहे. महाराष्ट्रातही आधुनिक शेतीची कांस धरलेल्या प्रगतीशील शेतकर्यांची कमतरता नाही. नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे शेतीला नाक मुरडणारे जसे आहेत तसे परंपरागत शेतीला फाटा देत आधुनिक शेती करणारेही काहीजण आहेत.
आधुनिक काळात सेंद्रिय शेतीचे महत्व वाढल्याने अनेक सुशिक्षित, उच्च शिक्षित तरुण शेतीत निरनिराळे प्रयोग करत आहेत. तंत्रज्ञानाचा वापर करून सेंद्रिय शेती करत आहेत. ज्यात सलमान खानही सहभागी आहे. परंतु कोरडवाहू शेती असल्यास बरेच काही करायची इच्छा असून साध्य करता येत नाही. त्यातूनही मार्ग शोधत काही तरुण शेतकरी स्वताची आर्थिक उन्नती साधत आहेत.
अहमद नगर जिल्हा तसा ऊसासाठी प्रसिध्द असून राज्यातील सर्वाधिक ऊसाचे उत्पादन घेणारा हा जिल्हा आहे. नगर जिल्ह्यात काही भागात पाण्याचे दुर्भिक्ष्यहीआहे. याच नगर जिल्ह्यातील पारनेर येथील तरुण शेतकरी बाळासाहेब गुंजाळ याने त्याच्या दैठणे गुंजाळ येथील ३५ एकर शेतीत तैवान जातीच्या पेरूंचे उत्पादन घेत १४ महिन्यात सुमारे ४०लाख उत्पन्न कमावले आहे. आगामी ३ महिन्यात आणखी २० लाख उत्पन्न हे पेरू देतील असा अंदाज आहे. पारनेर तालुका तसा पावसाच्या बाबतीत अल्पसंतुष्ट आसून दैठणे गुंजाळ येथे पावसाचे प्रमाण कमी आहे. परंतु पेरू हे कमी पाण्यात येणारे फळ आहे. पेरूला पावसाचे पाणी पुरते. इतर पाणी फारसे घालावे लागत नाही. परिणामी आकाराने मोठे व रसाळ पेरूचे पिक घेण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि त्यादृष्टीने दहा एकरात साडे आठ हजार झाडांची लागवड केली. ठीबक सिंचनाद्वारे पाणी घातले. या पिकाला कोणतेही रासायनिक खत घालावे लागत नाही. परिणामी कमी खर्चात अधिक नफा देणारे हे फळ आहे.
या पेरूचे वैशिष्ट्य म्हणजे एक पेरू ४०० ते ९०० ग्रॅमपर्यंत वजनदार असतो.साल पातळ असून चवीला मधुर असतो.गुलाबी रंगाचा हा पेरू गोडीला कमी असून टिकतोही चांगला. परिणामी भारतासह श्रीलंका, चीन व इतर युरोपिअन देशात याला चांगली मागणी आहे. आधुनिक दृष्टी ठेवत शेतीचा सखोल विचार करून एका तरूण शेतकर्याने केलेली ही प्रगती कौतुस्कापद आहे. बाळासाहेब गुंजाळ याने इतर शेतकर्यांनाही असे पीक घेण्यास प्रोत्साहन दिले आहे.
मित्रांनो माहिती आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.लेख जरुर शेअर करा.