
लोकं म्हणतात पवारांचा अदृश्य हात; पवार म्हणतात ‘हे सगळे खोटे आहे’.. नेमकं काय ते तुम्ही ठरवा!
शरद पवारांच्या राजकीय जीवनाकडे पाहिले तर त्यांची सगळ्याच क्षेत्रात तितकीच मैत्री आहे. त्यांचं सामाजिक, राजकीय, कला, साहित्य अशा आदी क्षेत्रातील अभ्यास, मैत्रीपूर्ण संबंध मोठे आहेत. त्यांची मदत करण्याची भावना ही प्रचंड मोठी आहे. मात्र त्यांच्या बद्दल असणारे अफवांचे पीक सुद्धा तितकेच मोठे आहे. मात्र स्वतः शरद पवारांनी सांगितले की सगळे खोटे आहे. मात्र पुन्हा लोकांनी या विधानाचा अर्थ सुद्धा वेगळाच घेतला. चला नेमका किस्सा काय आहे पाहू आपण..
१९८५ मध्ये शरद पवार शिक्षणाच्या निमित्त पुण्यात आले होते. तसेच त्यांचे काँग्रेस मधील काम सुद्धा तितक्याच ताकदीने सुरू होते. शरद पवारांच्या राजकीय उदयाची ही सुरुवात म्हणले तरीही हरकत नाही. त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी प्रवेश कॉमर्स महाविद्यालयात घेतला होता; पण त्यांचा रस साहित्य, राजकारण अशा वेगळ्याच ठिकाणी होता. असेच एकदा फर्ग्युसन महाविद्यालयाच्या नियतकालिकांत प्रसिद्ध झालेली भालचंद्र नेमाडे यांची एक कविता पवारांनी वाचली आणि या तरुणात काही तरी खास आहे, हे ओळखले.
भालचंद्र नेमाडे यांच्या भेटीसाठी जाण्याचे ठरवले. पण जाताना त्यांनी एक पुस्तक भालचंद्र नेमाडे यांना भेट म्हणून नेले इंग्रजी मध्ये चांगलेच ते पुस्तक गाजत होते. जे. डी. सालिंजर यांच्या ‘कॅचर इन द रॉय’ची प्रत घेऊन ते फर्ग्युसनमध्ये भेटले. आणि असल्या कविता वैगेरे लिहून प्रतिभा वाया घालू नकोस असे म्हणाले. ही कादंबरी घे आणि असे काही तरी लिही.’ पवारांनी ‘असे काही तरी लिही’ म्हटले होते; परंतु नेमाडेंनी चुकून ‘असेच्या असे काही तरी लिही’ असे ऐकले असे म्हणतात. त्यातूनच ‘कोसला’ लिहिली गेली. पवारांचा होरा किती अचूक होता हे नेमाडेंनी आणि ‘कोसला’नेही पुढे सिद्ध केले. पवारांनी कथालेखनाचा ‘फुटकळ’ असा केलेला उल्लेखही नेमाडेंनी कायमचा लक्षात ठेवला.
टीप : एवढ्या कौशल्याने लिहूनही कुणाला हे प्रसंग खोटे वाटत असतील, तर खऱ्याची दुनिया नाही, हेच खरे!
पवारांचा अदृश्य हात कुठे कुठे असतो याची ही बोलकी दृश्ये आठवली (सुचली), ती पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने. असा महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्राने एक लेख लिहिला होता. त्यावरून साभार!