
पवार साहेबांचा सच्चा माणूस आ. लंकेंच्या रूपाने समाजात काम करतोय : जयंत पाटील
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील यांनी अहमदनगर दौरा केला. जिल्ह्यातील विविध प्रश्नांच्या बाबतीत आढावा घेतला. सोबतच आमदार निलेश लंके यांच्या शरद पवार आरोग्य मंदिरास भेट दिली निलेश लंके यांच्या कामाचे कौतुक नामदार जयंत पाटील यांनी केले आहे.
शरदचंद्रजी पवार आरोग्य मंदिर नावाने सुरु केलेल्या या वैद्यकीय केंद्राला शनिवारी रात्री राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भेट दिली. निलेश लंके यांच्या कामाचे उभ्या महाराष्ट्रभरात कौतुक होत आहे. स्वतः त्यांच्या कार्याची दखल शरदचंद्रजी पवार साहेब यांनी घेतली. माध्यमांमध्ये त्यांच्या कार्याची सतत चर्चा सुरू असते. आरोग्य मंदिरास भेट दिल्यानंतर ना. जयंत पाटील यांनी त्यांचे तोंडभरून कौतुक केले. आ. लंके करत असलेल्या कामाचे कौतुक करत त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. पवार साहेबांचा सच्चा माणूस समाजात काम करत असल्याचे गौरवोद्गार पाटील यांनी काढले.