दत्तात्रय भरणेंच्या मदतीला पवार साहेब आले धावून…

0

इंदापूर : शरद पवारांनी तब्बल ५० वर्षे राजकारणामध्ये राहून इतक्या लोकांची मने जपली आहेत, की त्यांचा अफाट जनसंपर्क पाहून एखाद्या धडाडीच्या नेत्यालाही धडकी भरावी. पण, त्यांनी कधीही आपल्या कार्यकर्त्यांना आणि आपल्या पक्षातल्या मंडळीना नाराज केले आहे.

याचाच परत एकदा प्रत्यय आला तो इंदापूरमध्ये. इंदापूरमध्ये सुरू असलेल्य विकास कामांचा ऑनलाईन उद्घाटन समारंभ सुरु होता. यावेळी राज्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी या कार्यक्रमाला शरद पवार कामाच्या व्यापामुळे उपस्थित राहू शकले नाहीत, असे जाहीरपणे जनतेला सांगितले. परंतु, ऑनलाईन पद्धतीने का होईना त्यांनी पुढील काळात नागरिकांना मार्गदर्शन करावे, अशी मनातली सुप्त इच्छा देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली.

भरणे मामा म्हणाले, कोरोना महामारीचे संकट असल्यामुळे ऑनलाइन पध्दतीने विकास कामांची उद्घाटने करत आहोत. असे असले तरीदेखील, नवीन अद्यावत ऑनलाईन पद्धत चांगली आहे. पुढील काळात पवार साहेब देखील आगामी अशा ऑनलाईन कार्यक्रमात सहभागी होऊन आपणास मार्गदर्शन करतील.

आणि काय आश्चर्य! चक्क थोड्याच वेळात शरद पवारांनी ऑनलाईन पद्धतीने कार्यक्रमाला हजेरी लावली. तर अशा प्रकारे या भरणे मामांची इच्छा पवारांनी पूर्ण केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अचानक या सोहळ्यात चक्क ऑनलाइन पद्धतीने हजेरी लावल्याने कार्यकर्ते व उपस्थितांमध्ये उत्साह संचारला.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.