पटोले म्हणतात, फडणवीसांच्या नेतृत्वात केंद्रात जाऊ, बावनकुळेंच्या दुखत्या नशीवरही बोट!

0

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावर सगळेच पक्ष बोलताना दिसून येत आहेत. भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी यावरून आंदोलन केले. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले “ह्यांना ओबीसींना राजकीय आरक्षण द्यायचंच नाहीय, उठसुठ हे केंद्राकडे बोट दाखवतात. अरे नसेल तुमच्यात हिंमत तर आम्हाला सांगा, सुत्रं हाती द्या चार महिन्यात इम्पेरिकल डाटा तयार करुन ओबीसीचं आरक्षण पुन्हा आणतो. तसं नाही केलं तर राजकारणातून संन्यास घेईन”.

महाराष्ट्र मध्ये ठाकरे सरकार विरुद्ध देवेंद्र फडणवीस आसा वाढ होताना दिसत आहे. यावरती महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टीका केली आहे व काही प्रश्न उपस्थित केले आहेत. शिबिरात बोलत असताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी फडणवीसांच्या ओबीसी संदर्भातल्या घोषणांवर सवाल उपस्थित केला. ते म्हणाले, “फडणवीस म्हणतात की, चार महिन्यात ओबीसीचं आरक्षण आणून देतो, ते कुठून आणून देणार ते माहित नाही. पुढं पटोले असही म्हणाले की, आपण फडणवीसांच्या नेतृत्वात केंद्रात जाऊ”. असे म्हणत त्यांनी निशाणा साधला.

तसेच पुढे बोलताना नाना पटोले म्हणाले की ” बावनकुळे साहेब, आपलं आपल्याला करायचं आहे. दुसरे नाही करणार. बावनकुळे यांना तिकिट मिळालं नाही, तर ओबीसी समाज नाराज झाला. पुढं पटोले असही म्हणाले की, आरक्षण जाणे हे शुभ संकेत आहेत. त्यामुळे ओबीसी समाज एकत्र आला. पुढच्या काळात कुठलेही राजकीय पक्ष ओबीसी / व्हीजेएनटीच्या वाट्याला गेले तर आडवं पाडल्याशिवाय राहणार नाही. अशी रोखठोक भूमिका नाना पटोले यांनी मांडली!

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.