डॉक्टर पत्नीची कर्तव्यनिष्ठा पोलीस पतीच्या निधनानंतर तिसर्या दिवसापासून पत्नी कामावर हजर

0

कोरोना संसर्ग गतवर्षीपासून मोठ्या प्रमाणावर पसरला असून सामान्य नागरिकांच्या सेवेसाठी आरोग्य यंत्रणा कर्मचारी पोलीस रांत्रदिवस राबत आहेत. वास्तविक त्यांच्या जीवाला सर्वाधिक धोका असताना स्वताची कर्तव्यनिष्ठा ते पदोपदी दाखवून देत आहेत. कोरोनान अनेकांनी आपल्या जीवलगांना गमावल असून त्यांच्यावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. परंतु काही खंबीर व्यक्ती यातून स्वताला सावरत अविरत सेवाभाव जपत आहेत. मित्रांनो चला बघूया अशीच एक घटना.

मुंबई पोलीस दलात दाखल झालेले झेवियर रॉकी रेगो अतिशय मनमिळावू होते. कोरोनाच्या काळात ते आपली सेवा डॉक्टर पत्नीसह अविरत निभावत होते. परंतु रेगो यांना कोविड संसर्ग झाला आणि यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या डॉक्टर पत्नी मनीषा झेवियर रेगो यांना धक्का बसला. परंतु स्वताला सावरत खचून न जाता मनिषा यांनी स्वताच काम सुरू केले. डॉ मनीषा यांनी बोरीवलीच्या मॅटर्निटी होममध्ये कार्यरत आहेत. महिन्याला त्या १५ ते २० प्रसूति करतात. लोकांच समुपदेशन करतात.

डॉ मनीषा यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितल, माझ्या सारख्या अनेक डॉक्टरांची रुग्णांना गरज असून गर्भवती महिलांना तर जास्त निकड आहे. हे दिवस जातील परंतु आलेल्या संकटाचे भान ठेवत नागरिकांनी जबाबदारीने वागायला हवे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.