
अजितदादांच्या वाढदिवसाला रुग्णसेवा, महिनाभर मोफत अँजिओप्लास्टी-अँजिओग्राफी, संदीप क्षीरसागरांचं ‘महाआरोग्य शिबीर’!
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आमदार संदीप शिरसागर यांनी एक महिन्याचे शिबिर आयोजित केले आह. या महाआरोग्य शिबिराचे आयोजन करत या शिबिराच्या माध्यमातून मोफत अँजिओप्लास्टी-अँजिओग्राफी करण्याचा त्यांचा मानस आहे.
हे शिबिर एक महिना चालणार असून या शिबिरातून दररोज दहा रुग्णांची तपासणी केली जाणार आहे. आत्तापर्यंत 200 पेक्षा अधिक रुग्णांनी नोंदणी केलेली आहे. शक्य तेवढ्या रुग्णांना आरोग्याची सुविधा या शिबिराच्या माध्यमातून दिली जाणार आहे. काकू-नाना मेमोरीअल हॉस्पिटल आणि स्व. मोतीरामजी वरपे कार्डियाक युनिट (जालना रोड बीड) येथे मोफत अँजिओप्लास्टी, अँजिओग्राफी या मराठवाडास्तरीय मोफत महाआरोग्य शिबीराचे उद्घाटन आ. प्रकाश सोळंके यांनी केलं.
संदीप क्षीरसागर यांचे अजित दादा पवार यांच्यावरील असणारे प्रेम उभ्या महाराष्ट्राला माहित आहे सातत्याने ते अजित दादा चा कार्यकर्ता असल्याचे सांगत असतात. त्याच प्रेमापोटी सर्वसामान्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण राहील अशी शिबिराची संकल्पना त्यांनी राबवली आहे.