
पंकजा मुंडे अडचणीत! वैद्यनाथ साखर कारखान्यावर ईपीएफओ कार्यालयाची मोठी कारवाई
महाराष्ट्र राज्यातील ओबीसी चेहरा म्हणून ओळखला जाणाऱ्या पंकजा मुंडे सध्या चांगल्याच अडचणीत आल्या आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये त्यांना संधी मिळाली नाही, तर खासदार भागवत कराड यांना संधी देण्यात आली. त्यांची मंत्रिपद मिळवणे ही सुप्त इच्छा होती, हे आता लपून राहिलेले नाही. कारण कार्यकर्त्यांशी संवाद साधत असताना त्यांचा चांगलाच संताप दिसून आला. अशा मध्येच पंकजा मुंडे यांच्यासमोर यांच्यासमोर नवीन अडचण उभा राहिली आहे.
पंकजा मुंडे चेअरमन असलेल्या बीड जिल्ह्यातील पांगरी (ता. परळी) येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे बँक खाते कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (ईपीएफओ) औरंगाबाद विभागीय कार्यालयाने जप्त केले. या जप्तीद्वारे ९२ लाख रुपयांची थकबाकी वसूल करण्यात आली आहे.
कारखान्याकडे मार्च २०१८ ते ऑगस्ट २०१९ या काळातील कर्मचारी व कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीची एकूण १.४६ कोटी रुपये रक्कम थकीत होती. औरंगाबादच्या ईपीएफओ कार्यालयाने या वर्षातील सर्वात मोठी कारवाई करत कारखान्याचे बँक खाते जप्त करून ९२ लाखांची वसुली केली. उर्वरित ५६ लाख रुपयांच्या वसुलीसाठी कार्यवाही सुरू आहे.
कर्मचाऱ्यांनी १९ महिन्याचे वेतन मिळाले नाही म्हणूम आंदोलन केले होते. या वेळी इशारा दिला होता की १० दिवसात वेतनाचा प्रश्न सोडवा, नाहीतर कारखाना बंद करू. मात्र दहा दिवस संपल्यानंतर ही पेमेंट न मिळाल्याने अखेर कामगारांनी १० मार्च, २०२१ रोजी साखर कारखाना बंद ठेवत निषेध नोंदवला होता. त्यावेळी हे प्रकरण राज्यात चांगलेच गाजले होते. झालेली कार्यवाही ही पंकजा मुंडे यांच्यासाठी चांगलीच चांगलीच मोठी अडचण असल्याचे दिसून येत आहे.