पडळकरांची पवारांवर टीका, लंकेंनी समाचार घेतला, म्हणाले, ‘गोपीचंद 100 टक्के चुकले पण…

0

देशाचे नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावरती खालच्या पातळीवरती जाऊन गोपीचंद पडळकर यांनी वारंवार टीका केली आहे. खालच्या पातळीवर जाऊन टीका करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, मात्र सातत्याने पडळकर शरद पवार यांच्या वरती टीका करताना दिसून येतात. यावरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार निलेश लंके यांनी गोपीचंद पडळकर यांना स्पष्ट शब्दांमध्ये सुनावले आहे.

निलेश लंके म्हणाले की “शरद पवार हे देशातील सुसंस्कृत नेतृत्व आहे. त्यांच्यावर अशा शब्दात बोलणं शंभर टक्के चुकीचं आहे. महाराष्ट्राची भूमी ही महिलांचा मानसन्मान करणारी भूमी असून अश्याप्रकारे वक्तव्य करणं हे लोकप्रतिनिधीला शोभत नाही. पडळकरांच्या वक्तव्याचा मी निषेध करत करतो. इथून पुढे बोलताना त्यांनी काळजी घ्यावी, अशी वक्तव्य आम्ही खपवून घेणार नाही, असे स्पष्ट शब्दांमध्ये निलेश लंके यांनी पडळकर यांना सांगितले आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.