नाशिकमध्ये आॅक्सीजन टाकीला लागली गळती २४ जणांचा आॅक्सीजन कमतरतेने मृत्यू

0

नाशिक शहरासह ग्रामीण भागातही कोरोना रुग्ण संख्या वाढली असून प्रशासनामार्फत रुग्ण नियंत्रित करण्यासाठी शिकस्तीचे प्रयत्न केले जात आहेत.कोरोना नियंत्रणासाठी नियमावली जाहीर करत मोठ्या प्रमाणावर निर्बंधही लावले गेले असून लसीकरणही जोरात सुरू आहे.नाशिकमध्ये ठिकठीकाणी कोविड रुग्णांची सोय केली गेली असून रुग्णांना आॅक्सीजन बेड व व्हेंटिलेटर्सची सोय केली गेली आहे.

आज सकाळी १२.३०वाजता जुना नाशिक भागातील डॉक्टर झाकीर हुसेन हॉस्पीटलमधील१३हजार लिटर आॅक्सीजन टाकीला गळती लागली,टाकीमधून लाखो लिटर सिलेंडर हवेत पसरला.घटनास्थळी तातडीन अग्नीशमन दलाला बोलावण्यात आल,अग्नीशमन दल तसेच टाकीची तांत्रिक दुरुस्ती करणार्या लोकांनी आॅक्सीजन गळती थांबवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले.दुरुस्ती होईपर्यंत आॅक्सीजन गळून गेला.दरम्यान या रुग्णालयात कोविड रुग्णांची सोय असून आॅक्सीजन बेड उपलब्ध आहेत.या बेडवरील आॅक्सीजन लावलेल्या रुग्णांना आॅक्सीजन कमी पडून सुमारे २४जणांचा मृत्यू झाला.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या घटनेबद्दल तीव्र दुख व्यक्त केल असून रुग्णांच्या नातेवाईकांच सांत्वन केल आहे.राज्य शासनान मृतांच्या नातेवाईकांना ५लाखांची मदत जाहीर केली असून नाशिक महानगर पालिकेनेही ५ लाखांची मदत जाहीर केली आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.