कारागृहात पुरुष कैद्यांसाठी खुली वसाहत; महिलांसाठी लवकरच खुली वसाहत निर्माण करण्यात येईल – गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

0

महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी येरवडा मध्यवर्ती कारागृह ची पाहणी केली व आढावा बैठक घेतली या बैठकीमध्ये त्यांनी कारागृहाच्या बाबतीत तसेच कायद्याच्या बाबतीत विविध गोष्टींचा आढावा यावेळी घेतला. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून या आढावा बैठकीच्या बाबतीत त्यांनी माहिती दिली आहे.

“गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज येरवडा मध्यवर्ती कारागृहाची पाहणी करून आढावा बैठक घेतली. कैद्यांना न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणीसाठी हजर राहण्यासाठी सीआरपीसी मध्ये दुरुस्ती करून जास्तीत जास्त प्रमाणात व्ही.सी.चा वापर करून न्यायप्रक्रिया जलद करण्यासाठी देखील प्रयत्न करणार असल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले. यामुळे शासनाचा निधी व मनुष्यबळाची बचत होईल.

कारागृहात सध्या पुरुष कैद्यांसाठी खुली वसाहत आहे. त्या अनुषंगाने महिलांसाठी देखील खुली वसाहत निर्माण करण्यात येईल. तसेच परदेशातील कारागृहाप्रमाणे मुंबई येथील आर्थर रोड कारागृहात बहुमजली कारागृहाची उभारणी करण्यात येणार असल्याचे गृहमंत्री यावेळी म्हणाले”. हा निर्णय महिलांच्या दृष्टीने खूपच महत्वपूर्ण असा असणार आहे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी लवकरच निर्णय घेणार असल्याची घोषणा केली आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.