माती न वापरता घरातच केवळ पाण्यात उगवा या भाज्या, मिळवा आॅरगॅनिक भाजी आणि पोषक तत्व

0

लाॅकडाऊन काळात आपण घरपोहोच भाजीपाला वापरला असून एरवी भाजी मार्केटमधून भाजी आणली जाते. सध्या सेंद्रीय उत्पादनांना मागणी असून सेंद्रिय शेतीलाही महत्त्व मिळालेल आहे. सेंद्रिय शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. परंतु सॉईललेस फार्मिंग नावाचा एक प्रकार शेतीय वापरला जातो, म्हणजेच मातीविरहित शेती होय यात माती न वापरता केवळ पाण्यात भाजीपाला घेतला जातो याला हायड्रोपोनिक पध्दत म्हणतात.याचप्रकारे आपण घरातल्या घरात काही भाज्या उगवू शकतो.

गहू, मेथी दाणे, हरभरे, मोहरी या भाज्या आपण केवळ पाण्यात उगवू शकतो त्यासाठी आपल्याला या चारी वस्तू ५ ते ६ तास भिजत घालायच्या आहेत ज्याप्रमाणे आपण कडधान्य भिजवतो त्याप्रमाण या वस्तू भिजवा.५ ते ६ तासांनी पाणी उपसा व धान्य छीद्रांच्या प्लास्टीक चाळणीत पसरा मोहरी मात्र विना छीद्र कंटेनरमध्ये पसरा व वरून कॉटनचे ओले कापड पसरवा. आतील धान्य पूर्ण झाकेल अस कापड पसरवा. या कापडावर ४ ते ६ तासांनी पाणी शिंपडा. मेथी दाणे व हरभरे यांच्या प्लास्टीक चाळणीखाली पाण्याच पातेल भरून ठेवा पाणी पूर्ण भरायच नसून साधारण पाऊण पातेल पाणी भरा, मेथी दाणे आणि हरभरे पाण्यात भिजू नये याची काळजी घ्या.

१२ दिवसानंतर मेथी, गहू, मोहरी हरभरे यांना अंकुर येतील, पाने आल्यास ही भाजी साधारण दोन तास उन्हात ठेवा. २० दिवसानंतर भाज्यांची पाने वाढतील आता या भाज्या घराबाहेरच ठेवा. हरभरा आणि मेथीची मूळ पाण्यात बुडतील याची काळजी घ्या. साधारण २२ ते २५ दिवसात भाजी तयार होते.गव्हांकुर सात इंचापेक्षा जास्त वाढवू नका. अन्यथा त्याची पोषक तत्व कमी होतात. ही उगवलेली भाजी पूर्णपणे सेंद्रिय असून आपण कोणतही किटकनाशक वापरत नाही त्यामुळे ही भाजी आरैग्यासाठीही उत्तम असते.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.