एकीकडे रेमेडीसेवरचा तुटवडा, तर सुरतमध्ये भाजप कार्यालयात सापडला ५००० लसींचा साठा

0

गुजरात : राज्यात आणि देशात गेल्या दोन महिन्यांपासून करोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असून, गेले सलग तीन दिवस करोना बाधितांच्या संख्येत उद्रेक होताना पाहायला मिळत आहे.

देशात आलेल्या या दुसऱ्या लाटेने संपूर्ण देशात धुमाकुळ घातला असून, कोरोनाच्या नव्या स्ट्रेननं जलदगतीने रुग्ण बाधित होण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच, देशातील अनेक राज्यांमध्ये करोना लसींचा तुटवडा भासत आहे.

परिणामी देशभरात रेमडेसिविर इंजेक्शनच्या मागणीत मोठी वाढ झालेली पाहायला मिळत आहे. केंद्र सरकारने सांगितल्यानुसार, सध्या या इंजेक्शन्सचा साठा उपलब्ध नाही. मात्र दुसरीकडे गुजरातच्या भाजपच्या एका पक्ष कार्यालयात लोकांना रेमडेसिविर इंजेक्शन मोफत दिलं जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

गुजरातचे भाजप अध्यक्ष सीआर पाटील यांनी हा दावा केला आहे की, भाजप कार्यालयात ५ हजार रेमडेसिविर इंजेक्शन कोरोना संक्रमित लोकांच्या नातेवाईकांना दिलं जात आहे. या प्रकरणानंतर विरोधी पक्षांनी भाजपच्या नेत्यांना चांगलंच धारेवर धरलं आहे.

जर रेमडेसिविर स्टॉकमध्येच नाही, तर भाजपच्या कार्यालयात एवढ्या मोठ्या प्रमाणात या इंजेक्शन्सचा साठा आला कुठून? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. तसेच जर लसीकरणाची संपूर्ण जबाबदारी केंद्राकडे आहे, तर एखाद्या पक्षाच्या कार्यालयात एवढ्या मोठ्या प्रमाणात रेमडेसिविर कसं काय मिळू शकतं? अशा प्रकारचे अनेक सवाल विरोधकांकडून केले जात आहेत.

दरम्यान, सुरतमध्ये या भाजपच्या कार्यालयासमोर रेमडेसिविर इंजेक्शन घेण्यासाठी लोकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळत होत्या. यावेळी लोकांकडून करोना प्रतिबंधक सर्व नियमांना फाटा दिला गेल्याचे पाहायला मिळाले.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.