होळीच्या दिवशी केतकी चितळे पुन्हा चर्चेत

0

समाज माध्यमांवर बॉलीवूड सेलिब्रेटींना त्यांच्या व्हिडिओ ,फोटो,स्टेटमेंटमुळे बऱ्याचदा ट्रोल केले जाते. मात्र मराठी चित्रपटसृष्टीत ट्रोल करण्याचे प्रमाण तितके नाही, असे दिसून येत असले तरी सध्या मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिला ट्रोल करण्याचे प्रमाण वाढले आहे. तिचे हिंदी भाषेतून व्हिडीओ करण्याचा हट्ट असो किंवा शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख असो, यामुळे ती सतत चर्चेत राहिली. सध्या ती ऐन होळीच्या मोक्यावर चर्चेत राहण्याचे कारण म्हणजे तिने समाज माध्यमांवर प्रसिद्ध केलेला व्हिडीओ होय. या व्हिडिओमध्ये ती सोसायटीमधील एका महिलेला ओरडताना दिसत आहे.

होळीचा सण म्हणजे मजा, मस्ती आणि धमाल. या दिवशी होळी पेटवली जाते आणि होळीला सुवासिनी नैवेद्य दाखतात. तसेच लहान मुलं दिमडी वाजवतात. ही परंपरा गेली अनेक वर्ष सुरू आहे. या सणाची लोक आतुरतेने वाट पाहत असतात. मात्र याचा त्रास आता मराठी अभिनेत्री केतकीला झाला आहे. नुकताच केतकीने समाज माध्यमांवर एक व्हिडीओ प्रसिद्ध केला यात तिच्या सोसायटीमधील एका महिलेला ती ओरडत असताना दिसून येत आहे.तिचे महिलेला ओरडणे योग्य आहे कि नाही यावर तिला ट्रोल केले जात आहे. मात्र केतकीचे असे ओडरण्यामागचे काय कारण हे जाणून घेणे तितकेच महत्वाचे आहे.

 

केतकीला ‘एपिलेप्सीचा’ आजार लहानपणापासूनच आहे. यामध्ये जास्त आवाज आणि गोगांटाचा त्रास होत असतो. एपिलेप्सीला मराठीत ‘अपस्मार’ असे म्हणतात. हा एक दीर्घकालीन मेंदू विकार आहे, ज्यामुळे मेंदूमध्ये असाधारण क्रियाकलाप उद्भवू शकतात,असामान्य संवेदना आणि शुद्ध कमी होते.

होळीच्या दिवशी केतकीला सोसायटीमध्ये दिमडी वाजवण्याचा आणि लोकांचा खूप आावाज येत होता. या आवाजाचा त्रास केतकीला झाला. त्यामुळे तिने अनेकदा सोसायटीमधील लोकांना आवाज न करण्याची विनंती केली. पण कोणीच ऐकले नाही. केतकीने या त्रासाला कंटाळून पोलिसांकडे तक्रार केली. केतकीने एका महिलेला आवाजामुळे होणाऱ्या त्रासाबद्दल सांगितले तर त्या महिलेने केतकीसोबत भांडण केले. या महिलेचा व्हिडीओ तिने शेअर करत तिला होणाऱ्या त्रासाबद्दल सांगितले. तिला मानसिक आणि शारिरीक त्रास या आवाजामुळे सहन करावा लागला असे तिने या व्हिडीओमध्ये सांगितले आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.