अरे बापरे, तीन तोंडाचा साप..!अख्या सोशियल मीडियात धुमाकूळ घातलेल्या फोटो च रहस्य वाचून तुम्हाला सुद्धा विश्वास होणार नाही..!

0

जगात निसर्ग हा एक “अजूबा” च आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही,कारण निसर्ग ज्या गोष्टी ची कल्पना नसते त्याही गोष्टी माणसाला दाखवतो. आता असाच एक फोटो व्हायरल होत आहे, खरंतर ह्या फोटोला बघून खूप लोकांना जणू एक भीतीची चाहूल लागली,

कारण या फोटो मध्ये तीन तोंड असलेला साप दिसत आहे. पण हा तीन तोंड असलेला साप नसून निसर्गाचा एक अद्भूत चमत्कार आहे, मग हा साप नाही तर नेमकं काय आहे,हा प्रश्न नक्कीच तुम्हाला पडला असणार,चला तर बघूयात की हा सापासारखा दिसणारा भयावह प्राणी नेमकं आहे तरी कोण!

खरंतर ह्या फोटोत दिसणारा तीन तोंडाचा साप नसून, जगातील सर्वात मोठं फूलपाखरु आहे. कदाचित हे ऐकल्यानंतर तुमचा विश्वास बसला नसेल, पण हे खरं आहे. एटाकस एटलस नावाचं हे जगातील सर्वात मोठं आणि सर्वात सुंदर फूलपाखरु आहे.

फूलपाखरं हे किटकांच्या प्रजातीत येता, ज्यात अळीचा विकास होऊन फूलपाखरु तयार होतं. फूलपाखरु झाल्यानंतर अवघ्या 2 आठवड्यात हे प्रजननाचा काळ पूर्ण करते, मादा अंडी घालते आणि त्यानंतर ते मरतं. मात्र, आयुष्याच्या शेवटच्या दिवसांत हे निसर्गात असे काही रंग उधळतं, की पाहणारे आश्चर्यचकित झाल्याशिवाय राहत नाही.

या फूलपाखराच्या दोन्ही पंखाच्या टोकांना सापाच्या तोंडासारखे आकार असतात. शिवाय त्याचं डोकंही साप असल्याचाच भास देतं. या फूलपाखराच्या डोक्यावर सुंदर तुरा असतो. जेव्हा या फूलपाखराला कुणापासूनही धोका वाटतो, तेव्हा तो पंख फडफडवतो, आणि साप असल्याचा भास निर्माण करतो, त्यामुळे समोरचा शिकारी घाबरतो, आणि तिथून निघून जातो.

हे फूलपाखरु थायलंडच्या जंगलात सापडतं.निसर्गाची किमया तोच जाणे !किती अदभूत कलाकृती बनवल्या आहेत निसर्गाने, खरंतर हा जगातील सर्वांत मोठा आणि सुंदर फुलपाखरू एवढं भयावह दिसू शकतो,याची कल्पना तुम्हाला कधी आलीच नसणार!

आपण निसर्गाच्या सानिध्यात खेळू शकतो पण निसर्गाशी खेळू शकत नाही,ही सर्वांत मोठी वास्तविकता आहे.त्यामुळे निसर्ग खूप अतुलनीय आहे आणि त्याचा संरक्षण करून असे अद्वितीय प्राणी वाचले पाहिजे त्यासाठी आपल्या कडून कधी दुर्लक्ष होणार नाही याची काळजी सुद्धा आम्ही घेतली पाहिजे. पर्यावरण हेच आपले खरे जीवन!

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.