
राजकीय कुंभ मेळ्यावरही आक्षेप – संजय राऊत
एकीकडे कोरोना आपले हातपाय पसरायला सुरू करत होता आणि दुसरीकडे निवडणुकांनी चांगलाच माहोल बनवला होता. पश्चिम बंगाल येथील निवडणूक तर खूपच चर्चेचा विषय बनली. आपले आपले शक्तिप्रदर्शन करण्यात सगळेच व्यस्त होते. अशा काळात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जी सामंजस्य भूमिका घेत. निवडणूक रॅली काढायचे रद्द केले ही फार मोठी भूमिका होती. जगभरातून त्यांच्या या भूमिकेचे कौतुक झाले.
याच बरोबर केंद्रात सत्ताधारी असणार पक्ष मात्र जबरदस्त रॅली घेत, निवडणूक प्रचारात व्यस्त होता. पंतप्रधान यांनी देशातील परिस्थिती वाऱ्यावर सोडून निवडणुकीला प्राधान्य दिले. देशातील परिस्थिती पूर्ण हाताबाहेर गेली. तसेच ऑक्सिजन, इंजेक्शन, आरोग्याच्या सुविधा अशा गोष्टींची टंचाई निर्माण झाली. हे जर टाळता आले असते तर कित्येक लोकांचे जीव वाचवता आले असते.
संजय राऊत यांनी वक्तव्य केलं की देशात निवडणूक प्रचार जोरात सुरू होता. आता तरी सरकार ने मद्रास हाकोर्टाच्या टिपण्णी ला गांभीर्याने घ्यावं. निवडणुकांमुळेच कोरोनाचा प्रसार झाला, हे सत्य आहे. कुंभमेळ्यावर आक्षेप घेतो तर, या राजकीय कुंभमेळ्यावरही आक्षेप असे त्यांनी मत व्यक्त केले आहे!
खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा.