तर ओबीसींच नेतृत्व देवेंद्र फडणवीसांनी करावं, छगन भुजबळांची खुली ऑफर!

0

आज महाराष्ट्रभर मध्ये ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या साठी भारतीय जनता पक्षाने राज्यभर आंदोलन केले. तर दुसरीकडे राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार, छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत लोणावळ्यात ओबीसी चिंतन संपन्न झाली. या बैठकीमध्ये बोलत असताना छगन भुजबळ यांनी मोठे विधान केले आहे. छगन भुजबळ म्हणाले की “विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसींचं नेतृत्त्व करावं आणि केंद्र सरकारकडे जाऊन इम्पेरिकल डाटा मागावा” असं छगन भुजबळ म्हणाले आहेत.

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या बाबतीत ओबीसी संघटना आणि राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याची माहिती यावेळी भुजबळांनी बोलत असताना दिली. केंद्र सरकारकडे ओबीसींच्या इंम्पेरीकल डाटाची मागणी आम्ही करतोय. भाजपचं आजचं आंदोलन राजकारणापोटी आहे. त्यांना दाखवायचं आहे की आम्ही ओबीसींसोबत आहोत असेही छगन भुजबळ म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांना मोठी ऑफर देत छगन भुजबळ म्हणाले की ” देवेंद्र फडणवीस यांनी नेतृत्त्व करावं आणि केंद्र सरकारकडे जाऊन इम्पेरिकल डाटा मागावा”.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.