आता फक्त इतक्या रुपयात होणार कोरोनाची चाचणी, राजेश टोपेंची घोषणा !

0

महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्या वाढत असून कोरोना लक्षण जाणवत असल्याने चाचणी करून घेणाऱ्यांची संख्याही वाढत आहे.या सर्व पार्श्वभूमीवर सर्वसामान्य माणसाच्या खीशाचा विचार करून खाजगी प्रयोगशाळेत करण्यात येणाऱ्या कोरोना चाचण्यांचे दर सुधारित करण्यात आले आहेत.कोरोना निदान करण्यासाठी RTPCR ही चाचणी करावी लागते.त्यासाठी500 रुपये आकारण्यात येणार आहेत.याबरोबरच अँटीजेन टेस्ट 150 रुपये करण्यात आली आहे.आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबत शासन निर्णय जाहीर केला असून सर्व खाजगी प्रयोगशाळांना हा निर्णय बंधनकारक असून यापेक्षा जास्त पैसे आकारात येणार नाहीत.

राज्यात कोरोना चाचणीचे दर सातत्याने निश्चित करण्यात येत असून 4500 रुपयांवरून या चाचणीचे दर 500 रुपये केले आहेत.परिणामी सर्व सामान्य नागरिकांना दिलासा मिळणार आहे.राज्यात कोरोनाचा दुसरा स्ट्रेंथ असून लक्षण बदलली आहेत परिणामी चाचणी करून घेणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढलेली आहे.परिणामी सर्वसामान्यांकडून चाचणी दरावरून टिका होत होती त्यावर निर्णय घेत शासनाने चाचणीचे दर निश्चित केलेले आहेत.

यापूर्वीही कोरोना चाचणी दर अनुक्रमे सप्टेंबर, आॅक्टोबर आणि डिसेंबर या महिन्यात अनुक्रमे 1200,900,700 असे ठरवण्यात आले होते.सद्यनिर्णयात हे दर 500,600 व 800असे निश्चित करण्यात आले आहेत.रुग्णाच्या निवासस्थानी स्वॅब नमुना घेऊन त्याची चाचणी करून अहवाल देण्यास 800 रूपये आकारण्यात यावेत.कोविड केअर सेंटरमधून स्वॅब घेऊन प्रयोग शाळा येथे तपासणी व अहवाल यासाठी 600 रुपये आकारण्यात यावे तर संकलन केंद्रावर नमुना घेत तेथून त्याची वाहतूक प्रयोगशाळेत करत अहवाल देणेसाठी 800 रूपये आकारावेत असा निर्णय जाहीर केला आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.