‘देशात कोणीही सुरक्षित नाही, हिंमत असेल तर सरकारने पेगासस प्रकरणी चर्चा करावी’

0

देशातील महत्त्वाच्या लोकांचे फोन टॅप करत त्यांचा संवाद ऐकणे, मेसेज व फोन मधील महत्त्वपूर्ण अशी माहिती वरती हेरगिरी करण्यात आली आहे. देशातील या महत्त्वाच्या व्यक्तींच्या फोन वरती पाळत ठेवून माहितीचा गैरवापर करण्यात आला आहे. या हेरगिरीला द वायर’ या महत्वपूर्ण अशा वेबसाईटसह आणि अन्य १६ माध्यम संस्थांनी केलेल्या संयुक्त आंतरराष्ट्रीय शोधपत्रकारितेतून या बाबीला पुष्टी मिळाली आहे.

या हॅकिंगद्वारे भारतातील मंत्री, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, न्यायाधीश, राजकीय रणनितीकार यांच्यावर पाळत ठेवण्यासाठी त्यांचे फोन हॅक करण्यात आले असण्याची शक्यता या माध्यम संस्थांच्या ‘प्रोजेक्ट पेगॅसस’मध्ये व्यक्त करण्यात आली आहे. या मधील महत्वपूर्ण नावे म्हणजे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, माहिती व तंत्रज्ञानमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासह अन्य एक मंत्री, निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर, माजी निवडणूक आयुक्त अशोक लवासा आदींनाही ‘पेगॅसस’द्वारे लक्ष्य करण्यात आल्याची शक्यत वर्तवली आहे.

यामागे नेमके कोण आहे तसेच या माहिती घेण्याचा नेमका उद्देश काय होता हे स्पष्ट होणे गरजेचे आहे. तितकेच महत्त्वाचे म्हणजे किनालाही कोणाचीही कॉल, मेसेज, गॅलरी, स्थळ या माहिती घेण्याचे अधिकार नाहीत. अशा प्रकारे खाजगी माहिती घेत अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणत कायद्याचे उल्लंघन झाले असल्याचे बोलले जात आहे.

शिवसेनेनं याप्रकरणी आक्रमक भूमिका घेतली असून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. ‘पेगासस प्रकरणाचा जो भांडाफोड झाला आहे. त्यावरून या देशात कोणीही सुरक्षित नसल्याचं उघड झालं आहे. हा देशाशी धोका आहे. देशातील जनतेशी धोका आहे. ही हेरगिरीच नाही तर विश्वासघातही आहे, असं सांगतानाच आम्ही या मुद्द्यावर संसंदेत आवाज उठवू. हिंमत असेल तर सरकारने आमच्याशी या मुद्द्यावर चर्चा करावी,’ असं आव्हान संजय राऊत यांनी दिलं आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.