महाविकास आघाडीत कोणीही मिठाचा खडा टाकण्याचे काम करू नये, अजित दादा पवारांचे खडे बोल

0

बारामती : आजच्या सामना या वृत्तपत्रात संजय राऊतांनी गृहमंत्री अनिल देशमुखांवर टिका असत राज्याची प्रतिमा मलीन होत असल्याचे सुतोवाच केले होते, परिणामी राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले असताना विविध शंकांना उत आलेला दिसून येत आहे. सध्या राज्यात कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना महाविकास आघाडी करत सत्तेत आहे.राज्यात कोरोना रुग्णांची वाढत असतानाच विविध विषयांनी राजकारणही ढवळून निघत आहे.

या पाश्र्वभूमीवर संजय राऊतांनी गृहमंत्री अनिल देशमुखांवर केलेली टिका चर्चेचा विषय बनलेली आहे.संजय राऊत सामानाचे संपादक असून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे निकटवर्तीय आहेत त्यांनी अशाप्रकारे सामन्यातून गृहमंत्री अनिल देशमुखांवर टिका करणे अपेक्षित नव्हते.

या सर्व पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संपर्क केला असता अजित पवार म्हणाले, राज्यात सध्या महाविकास आघाडीचे स्थिर सरकार असून आघाडीतील नेत्यांनी किंवा निकटवर्तीय लोकांनी एकमेकांवर टिका करत एकमेकांना अडचणीत आणू नये.अनिल देशमुखांना गृहमंत्री करण्याचा निर्णय सर्वतोपरी मा शरद पवार साहेबांचा होता,यापूर्वीही साहेबांनी अशा निर्णय प्रक्रियेत भाग घेतलेला आहे.

अजित दादा म्हणाले, महाविकास आघाडी सरकार चांगल काम करत असून स्थिर आहे परिणामी कोणीही त्यात मिठाचा खडा टाकण्याचे काम करू नये.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.