नितीन गडकरींकडे जबाबदारी देण्याचा सल्ला ऐकला असता; तर देशातील परिस्थिती नियंत्रणात असती – स्वामी

0

देशातील स्थिती अधिकाधिक गंभीर होत असल्याच्या मुद्द्यावर पुन्हा टीका करताना सुब्रमण्यम स्वामी यांनी कठोर शब्दांत टीका केली आहे. मी नितीन गडकरी यांच्या बाबतीत मी दिलेला प्रस्ताव स्वीकारला गेला असता तर चांगले झाले असते असे सुब्रमण्यम स्वामी म्हणाले. देशातील कोरोणाच्या विरूद्ध लढाई मध्ये तरी नितीन गडकरी यांच्या हाती देशाची कमान द्यावी. त्यांनी जर हा प्रस्ताव स्वीकारला असता तर देशातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आली असती.

नितीन गडकरी यांच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवत त्यांनी हा दावा केला आहे. मात्र आता देशातील परिस्थिती नियंत्रणात यावी म्हणून स्वतः सर्वोच्च न्यायालयाने एक समिती स्थापन केली आहे. अगोदर गृह मंत्रालय आदेश देत होतं. आता सरकारला सर्वोच्च न्यायालयाचं ऐकावं लागलं. ही लोकशाही असणाऱ्या देशात ही एकप्रकारे सरकारची हार आहे. अशा शब्दात स्वामी यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र डागले आहे.

केंद्र सरकार सगळ्या बाबतीत अपयशी ठरत आहे. कामाच्या बाबतीत नियोजनशून्य कारभारामुळे सगळीकडे अनागोंदी झाल्याचे दिसून येत आहे. सक्षम पणे देशाचे आरोग्यमंत्री जबाबदारीने निर्णय घेताना दिसत नाहीत. ठोस असे पाऊले नरेंद्र मोदींनी सुद्धा अजुन उचलली नाहीत. जगभरातून यावर टीका होताना दिसत आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.