नितीन गडकरी चुकीच्या पक्षात, त्यांचे पंख छाटले जात आहेत –

0

देशभरातून नरेंद्र मोदी यांच्या कामकाजावर देशभरातून टीका होत आहे. त्यांच्या माध्यमांच्या मधून बनवलेल्या छबि वरती टीका होताना दिसत आहे. गुजरात मधील वाढलेले आकडे, मृत्यू पाहून देशभरात गुजरात मॉडेल उभा केलेलं सपशेल फेल आहे असे दिसून आले आहे.

अशाच काळात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कर्यावर्ती मात्र कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे. पत्रकार परिषदेत माजी मुख्यमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा काँगेस नेते अशोक चव्हाण म्हणाले “नितीन गडकरी यांच्या बाबतीत एवढेच म्हणावेसे वाटते, `राईट पर्सन, इन राॅंग पार्टी`, गडकरी हे चुकीच्या पक्षात आहेत, त्यांचे पंख छाटले जात आहेत, अशा शब्दात काॅंग्रेस नेते तथा राज्याचे सार्वजनिक बांधकामंत्री अशोक चव्हाण यांनी गडकरीबद्दलचे मत व्यक्त केले”

केंद्रातील मोदी सरकारला सात वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्त देशात काँग्रेसने मोदींच्या कार्यकाळातील देशाच्या झालेल्या वाताहात बद्दल आंदोलने केली. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती केली आहे. यावेळी बोलत असताना अशोक चव्हाण म्हणाले नितीन गडकरी यांची काम करण्याची पद्धत ही निराळी आहे तसेच राज्याला पुढे घेऊन जाणारी आहे. राज्यात त्यांच्या विरोधी विचारांचे सरकार असले तरी राज्याच्या हिताच्या बाबतीत निर्णय घेण्यासाठी नितीन गडकरी कायम सकारात्मक असतात.

Leave A Reply

Your email address will not be published.