नीरव मोदी आणि मेहुल चौक्सींचे मोदींशी चांगले संबंध असल्याने कारवाई नाही; हसन मुश्रीफ

0

देशातील बँकांना कोट्यवधी रुपयांचा चुना लावून परदेशात फरार झालेल्या नीरव मोदी आणि मेहुल चौक्सीवरून हसन मुश्रीफ यांनी आक्रमक होत नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.

ते म्हणाले की नीरव मोदी आणि चोक्सीचे पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चांगले संबंध आहेत. त्यामुळेच या दोघांवर कारवाई केली जात नाही.

हसन मुश्रीफ यांनी पत्रकारांशी बोलताना असे वक्तव्य करत केंद्र सरकारवर टीका केली आहे. मोदींशी त्यांचे चांगले संबंध आहेत; त्यामुळेच त्यांच्यावर कारवाई केली जात नाही असे ते म्हणाले.

भारतातून चोक्सीला आणण्यासाठी आठ सदस्यांचं पथक डोमिनिकाला गेलं होतं. या पथकाला रिकाम्या हाताने परत यावं लागलं आहे. कारण डोमिनिका हायकोर्टाने चोक्सीच्या प्रकरणावरील सुनावणी स्थगित ठेवली आहे. यामुळे त्याचं भारताकडे प्रत्यार्पण होऊ शकेल नाही अशी माहिती समोर आली आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.