बाई वाड्यावर या ‘ फेम निळू फुलेंची मुलगी आहे प्रसिध्द अभिनेत्री, या मालिकेत करतेय काम

0

निळू फुले हा अभिनेता मराठी माणसाच्या मनात घर करून राहिला आहे. निळू फुले यांनी साकारलेला सरपंच आजही नवीन पिढीतील कलाकारांना दिशादर्शक ठरतो. निळू फुले यांच्या अभिनयाची सुरुवात सेवा दलाच्या कार्यक्रमातून झाली. निळू फुलेंचा खलनायक अजरामर ठरलेला आहे. सामना, हळदी कूंकू, बीन कामाचा नवरा, सासू वरचढ जावई असे मराठी चित्रपट तर केलेच पण काही हिंदी चित्रपटातही त्यांनी भूमिका निभावल्या. निळू फुले पडद्यावर खलनायकाच्या भूमिका करत असले तरी वैयक्तिक आयुष्यात अतिशय शांत, परोपकारी आणि सालस होते. निळू फुले यांना एकच मुलगी आहे, गार्गी थत्ते. चला थोड्या गप्पा मारू तिच्याबद्दल.

निळू फुले यांच्यामुळे गार्गी फुले थत्ते यांना घरातूनच अभिनयाचा वारसा मिळाला. गार्गी यांचा जन्म पुण्यातील असून त्यांच शालेय शिक्षण पुण्यातच पार पडल. एम ए करण्यासाठी त्या मुंबईत होत्या. काॅलेजमध्ये असताना त्यांनी अनेक नाटकात काम केल आहे. रंगमंचावर काम केल्यावर त्यांनी झी युवा वाहिनीवरील कट्टी बट्टी मालिकेत काम केले. ही मालिका सुरू असतानाच त्यांनी तुला पाहते रे मालिकेची आॅफर आली परंतु त्यांनी नकार दिला. निर्मात्यांनी पुन्हा विचारल्यावर कट्टी बट्टी मालिका संपल्यावरच मी तुला पाहते रे मालिका करेन असे त्यांनी स्पष्ट सांगितले. निर्मातेही थोडे दिवस थांबले आणि या मालिकेत त्यांनी ईशाच्या आईची भूमिका केली. ही चाळकरी आई सर्वांनाच आवडली.

गार्गी फुले थत्ते सध्या कलर्स मराठीवरील राजा राणीची ग जोडी या मालिकेत बेबी मावशीच पात्र साकारत आहेत. गार्गी फुले यांनी २००७ साली ओंकार थत्तेशी विवाह केला. त्यांना अनय नावाचा एक मुलगा आहे. गार्गी यांनी वेशभूषा क्षेत्रातही काम केलेल आहे. खाण्याची आणि खिलवण्याची त्यांना विशेष आवड आहे. त्यांचे वडील निळू फुले यांनी दिलेला एक कानमंत्र त्यांनी सांगितला, तो म्हणजे कॅमेरासमोर असताना स्वताला अमिताभ बच्चनच समजायच. कितीही मोठा कलाकार असला तरी आपला अभिनय तोडीस तोडच झाला पाहिजे. हा कानमंत्र घेऊन वावरणारी ही अभिनेत्री कशी वाटते नक्की सांगा.

Leave A Reply

Your email address will not be published.