आ.लंकेच्या मनातली गोष्ट! या मुळे दिले कोविड सेंटरला शरद पवारांचे नाव…

0

मदार निलेश लंके यांनी जो अकराशे बेडचे कोविड सेंटर उभा केले आहे. या माध्यमातून आजतागायत हजारो लोकांवरती उपचार झाले आहेत त्यांच्या या कार्याची दखल विविध समाज माध्यमांनी तसेच महाराष्ट्रातील जनतेने घेतली आहे त्यांनी या कोविड सेंटरला शरद पवार आरोग्य मंदिर असे नाव का दिले याबद्दल त्यांनी माहिती सांगितले आहे.

आ. निलेश लंके म्हणतात १९९३ साली किल्लारीला भूकंप झाला, तेव्हा धावून कोण गेलं. दोन वर्षांपूर्वी सांगली-कोल्हापूरला महापूर आला, तेव्हाही हा ८० वर्षांचा योद्धाच धावून गेला. म्हणजे, ज्यावेळेस संकट आलं तेव्हा शरद पवारच धावून गेले आहेत.

आपल्याला काटा टोचला तर आपण म्हणतो, आई sss गं.. आणि जर एखादा नाग दिसला तर आपण म्हणतो बाप रे. शरद पवार हे आपल्यासाठी वडिलांच्या जागी आहेत, महाराष्ट्रावर संकट आलं तेव्हा ते आधार देतात. म्हणूनच मी या कोविड सेंटरला शरद पवार यांचं नाव दिलं.

शरद पवारांचे कार्य हे फार मोठे आहे. देशात कोणती अडचण असेल, देशामध्ये कोणतेही संकट असेल तर शरद पवार खंबीरपणे उभे राहतात. तीच प्रेरणा शरद पवार साहेबांच्या कडून घेऊन आमदार निलेश लंके यांनी कोविड सेंटरला आदरणीय शरद पवारांचे नाव देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करत कोविड सेंटर स्थापन केलं आहे. शरद पवारांच्या आदर्श कार्याचा आदर्श घेत निलेश लंके समाजोपयोगी कार्य करत आहेत

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.