कुटुंबातील सदस्याच्या मृत्यूचे दुःख पोटात घालून नीलेश लंके पुन्हा जनतेच्या साठी मैदानात!

0

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार निलेश लंके यांच्या कार्याचे सगळीकडे कौतुक होत आहे. आपल्या कामाच्या वेगळ्या पद्धतीमुळे ते सध्या फार चर्चेत आहेत. सर्वसामान्य माणसाच्या समस्यांच्या असणारी जाणीव फार मोठी आहे. त्यांनी शरद पवार साहेबांच्या नावाने तब्बल अकराशे बेडचे बेडचे सेंटर सुरू केले. स्वतःहून पवार साहेबांनी, अजित पवार, आणि जयंत पाटलांनी या कामाचे कौतुक केले आहे. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या न्यूज चॅनल नाही या गोष्टीचा दखल घेतली आहे

आमदार नीलेश लंके यांचे चुलते बाळासाहेब लंके यांचे बुधवारी कोरोना ने रात्री निधन झाले. अंत्यसंस्कार उरकून आ. निलेश लंके हे दुःखात असताना सुद्धा लोकांच्या दुःखाचा विचार करत. लोकांच्या जीवाची जबाबदारी आपल्या खांद्यावर आहे याची जाणीव ठेवत रात्री बारा वाजण्याच्या सुमारास भाळवणी येथील कोव्हिड सेंटरला दाखल झाले.

त्यांचे चुलते कै. बाळासाहेब लंके यांचे फुफूस निकामी झाल्याने बुधवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमरास त्यांचे निधन झाले. त्यांचे अंत्यसंस्कार करून आ.निलेश लंके यांनी रात्री बारा वाजता भाळवणी येथील कोव्हिड सेंटरमध्ये दाखल होत रूग्णांची विचारपूस केली. त्यांनी आरोग्य विभाग यांच्याशी परिस्थिती संदर्भात विचारपूस केली.

आपलं कुटुंब म्हणजे आता मतदारसंघ आहे अशी धारणा मनात ठेवून अा. निलेश लंके अहोरात्र, सुख दुःख अशा काळात पण काम करत आहेत. त्यांच्या कार्याची खरंच सगळे कौतुक करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.