अॅम्बुलन्सचं टेअरिंग हाती घेत आ.निलेश लंके बनले ‘सारथी’: फलटण मार्गावर सफर

0

 

माणसं जगली पाहिजेत म्हणून अहोरात्र काम करणाऱ्या आ.निलेश लंके यांची चांगलीच राज्यभरात चर्चा सुरू आहे. त्यांनी लोकांना आरोग्य सुविधा तत्काळ मिळावी म्हणून ११०० बेडचे कोव्हिड केअर सेंटर सुरू केले. या कोव्हिड केअर सेंटरला परदेशातून सुद्धा मदत मिळालेली आहे.

आ.निलेश लंके हे स्वतः या कोव्हिड सेंटरमध्ये थांबून रुग्णांची काळजी घेत असल्याचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत. इतकेच काय तर ते त्याच ठिकाणी जेवण करतात. रुग्णांची देखभाल करण्यासाठी कधी कधी तर ते तिथे झोपतात सुद्धा. त्यांच्या कार्याची दखल घेणाऱ्या बातम्या देखील प्रसिद्ध झाल्या.

नुकतेच साताऱ्यातील फलटण मार्गावर आमदार लंके स्वतः अॅम्बुलन्सचं टेअरिंग हात घेत वाहन चालवतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यांच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे. फलटण मार्गावरील त्यांची अॅम्बुलन्स चालवण्याची कृती देखील आणखी भाव खाऊन गेली. लंके स्वतः अॅम्बुलन्सचं टेअरिंग हात घेत ते कोविड रुग्णांचे सारथी बनले. तद्नंतर त्यांनी फलटणातील रुग्णालयांत जावून कोविड रुग्णांची विचारपूस करत काळजी घेण्याचे आवाहनही केले. सगळ्याच गोष्टी स्वतः लक्ष देऊन पाहणे, समजून घेणे हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा हातखंडा आहे असे दिसून येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.