
आ. निलेश लंके यांच्या कोविड सेंटर म्हणजे गोकुळ झालं आहे हा व्हिडिओ होत आहे व्हायरल!
सर्व सर्वसामान्य माणूस आमदार झाल्यानंतर किती चांगलं काम करू शकतो याचं मोठे उदाहरण म्हणजे आ. निलेश लंके. आज उभ्या महाराष्ट्राला त्यांच्या कार्याची भुरळ पडली आहे. त्यांनी कोरोनाच्या कालावधीमध्ये लोकांच्यासाठी कोविड सेंटर उभा केले. तब्बल अकराशे लोकांना त्या ठिकाणी एका वेळी उपचार घेत आहेत.
आ. निलेश लंके यांनी याच बरोबर रुग्णांना पोषक असा आहार उपलब्ध करून दिला. रुग्णांची देखभाल करण्यासाठी निलेश लंके अहोरात्र कष्ट करताना दिसून येतात; कित्येक वेळा घरी जाण्यासाठी वेळ न मिळाल्यामुळे आ. निलेश लंके कोविड सेंटर मध्येच झोपले. रुग्णांना जो आहार मिळतो तोच आहार स्वतः हा निलेश लंके घेताना दिसतात. माझ्या माणसांसाठी मला हे सगळं करावं लागतं; मी काळजी नाही घेतली तर इतर कोण त्यांची काळजी घेणार.
कोविड सेंटर मधील वातावरण प्रसन्न राहावे, रुग्णांना सकारात्मक ऊर्जा मिळावी; जेणेकरून त्यांना लवकरात लवकर बरे होता येईल. या दृष्टिकोनातून निलेश लंके यांनी संगीताचा कार्यक्रम व गायनाचा कार्यक्रम कोविड सेंटर येथे ठेवला होता. स्वतः रुग्ण या कार्यक्रमामध्ये मोठ्या तन्मयतेने सहभागी झाले होते. आमदार निलेश लंके यांचा हा उपक्रम महाराष्ट्रातील जनतेच्या बरोबरच रुग्णांचे ही मने जिंकत आहे. या कार्यक्रमाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडिया वरती चांगलाच व्हायरल झाला आहे.