या आमदाराच्या कोविड सेंटरला मिळत आहे विदेशातून मदत!

0

कोरोना मध्ये माणसं वाचवली पाहिजेत हा उद्देश ठेवून जोमाने लोकप्रतिनिधी काम करताना दिसत आहे. आपल्याला जे करता येईल ते करण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न आहे. फक्त या परिस्थितीवर मात झाली पाहिजे येवढाच उद्देश ठेवून जोमाने काम करताना दिसत आहे.

आ.निलेश लंके यांनी कोरोना रूग्णांवर उपचार करण्यासाठी भाळवणी येथील नागेश्‍वर मंगल कार्यालयात सुरू केलेल्या शरदचंद्र पवार आरोग्य मंदिरासाठी देशविदेशातून दररोज मोठ्या प्रमाणावर मदत मिळत आहे. आजतागायत तब्बल ५० लाख रुपयांची मदत नीलेश लंके प्रतिष्ठाणच्या सेंट्रल बँकेतील खात्यावर अनेक नागरीक थेट मदत करीत आहे. फोन पे, गूगल पे आदी अशा माध्यमातून आली आहे. तसेच मतदारसंघातील विविध गावातून भाजीपाला, फळे, अंडी, दूध आदी गोष्टी आरोग्य केंद्रात नागरिक आणून देत आहेत.


मतदारसंघातील जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी ६ लक्ष रुपयांच्या पेक्षा जास्त मदत आ. निलेश लंके यांच्याकडे देण्यात आली आहे. लोकांना आपल्या लोकप्रतिनिधी वरती विश्वास असला की खुल्या हाताने मदत करायला काही वाटत नाही या गोष्टीची जाणीव होत आहे!

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.