
आ.निलेश लंके यांच्यावर गायलेल्या गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर होतो आहे व्हायरल
आमदार निलेश लंके यांच्या कामावर लोक फारच खुश आहेत. जनतेच्या सेवेसाठी तत्पर असणाऱ्या या नेत्यावर लोक गाणे गात आहेत. चित्र काढत आहेत, तर काही विविध कलेच्या माध्यमातून प्रेम व्यक्त करत आहेत.
“गेले चार – पाच दिवसांपूर्वी सोशल मीडिया वर प्रचंड वायरल होत असलेले सौ. स्वाती घोडे यांचे व्हिडिओ आपण पाहिले असतील. आज प्रत्यक्षात त्यांनी ऑफीस ला भेट देत सुंदर आवजात गाणे गायले,ताई चा आवाज खुप छान आहे,धन्यवाद”
अशा आशयाची पोस्ट करत अा. निलेश लंके यांनी ऑफिस मधील स्वाती घोडके यांनी गायलेला व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला आहे. सर्वत्र निलेश लंके यांच्या कार्याचे कौतुक होत असताना. या माऊलीने आपल्या आवाजात गायेलेल गाणे सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.