‘नव्या पिढीला भीती वाटतीय, लक्ष घाला’, पडळकरांविरोधात रोहित पवारांची थेट मोदी-नड्डांकडे तक्रार

0

महाराष्ट्रातील राजकीय संस्कृती ही सभ्यतेची आहे. ज्येष्ठांना मान देणे हा आपला महाराष्ट्राचा पायंडा आहे. मात्र या गोष्टीला गालबोट लावण्याचा प्रयत्न पडळकर आपल्या वक्तव्या मधून वारंवार करत आहेत. देशाचे नेते शरद पवार यांच्यावरती अतिशय खालच्या पातळीवरची भाषा ते वापरतात. याच गोष्टीवर आक्रमक होत, आमदार रोहित पवार यांनी गोपीचंद पडळकर यांची मोदी आणि नड्डा यांच्याकडे तक्रार केली आहे.

रोहित पवार म्हणतात “आपल्याकडे स्त्री ला देवी मानून म्हणून तिची उपासना करण्याची संस्कृती आहे पण त्या ‘थोर’ नेत्याने आपल्या वक्तव्यात महिलांचा अनादरही केला आहे आश्चर्य म्हणजे राज्यातील अन्य कोणत्याही भाजपा नेत्याने त्यांना फटकारले नाही, किंवा त्यावर भाष्यही केले नाही….”

“राज्याच्या संस्कृती हे शोभा देणारं नाहीच पण माझ्यासारख्या नवीन पिढीला अशी भीती वाटते की अशा ‘महान’ नेत्याने केलेल्या वाईट विधानांमुळे राज्यातील राजकीय संस्कृती खराब होईल. आम्ही हे होऊ देणार नाही, परंतु आपल्यासारख्या वरिष्ठ नेत्यांनीही योग्य पावले उचलली पाहिजेत, ही आमची अपेक्षा आणि विनंती आहे….” आशा आशयाचे ट्विट करत त्यांनी तक्रार केली आहे.

पडळकर यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. पडळकर वारंवार शरद पवारांवरती खालच्या भाषेमध्ये टीका करतात ही गोष्ट महाराष्ट्रातील जनतेला रुचत नाही.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.