
अशा स्त्रीसोबत कधीही करू नका लग्न आयुष्यभर कराल पश्चाताप
चाणक्यनीति किंवा चाणक्यनीतिशास्त्र हा आचार्य चाणक्य लिखित असा ग्रंथ आहे ज्यात जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावरील समस्येचे मार्गदर्शन केलेले आहे.जीवन सुधारण्यासाठी या ग्रंथात अनेक उपाय दिले असून त्यांचा वापर प्रत्यक्षात केल्यास निश्चितच फायदा होतो.आचार्य चाणक्य महान कूटनीति तज्ञ होते.त्यांना राजकरणातील डावपेच तर येतच असत परंतु एखाद्या विशिष्ट व्यक्तीची मनोदशा ते अचूक ओळखत असत.तसेच तो पुढे कसा वागेल याचा अंदाज करत असत.जो तंतोतंत खरा येत असे.आचार्य चाणक्यनी जीवनातील हे प्रयोग प्रत्यक्षात करून बघितले व ग्रंथ लिहिला.आचार्य चाणक्यच्या ग्रंथानुसार लहान मुलापासून ज्येष्ठापर्यंत कोणाचाही स्वभाव ओळखता येऊ शकतो.तसेच नात्यांची गुंतागुंत सोडवता येऊ शकते.आचार्य चाणक्यनी अनेक नीतिसूत्र दिली असून मित्रांनो आज आपण विवाहयोग्य महिलांशी संबंधित काही सूत्र वाचणार आहोत.
चाणक्यच्या मतानुसार स्त्रिया कोणतीही गुप्त बाब स्वतापुरती मर्यादित ठेवू शकत नाहीत.त्या गुप्त गोष्टीचा गाजावाजा करतात.परिणामी स्त्रियांसोबत एखादी गुप्त बाब व्यक्त केल्यास त्या त्यांच्या सवयीप्रमाणे दुसरीकडे सांगतात.म्हणूनच चाणक्य अशा स्त्रियांना विश्वासपात्र मानत नाही.चाणक्यनीतिनुसार पुरुषांनी काही स्त्रियांसोबत कधीही विवाह करू नये.जर या स्त्रियांसोबत पुरुषाने विवाह केला तर त्याला आयुष्यभर पश्चाताप करण्याची वेळ येते.
आचार्य चाणक्यच्या मतानुसार स्त्रीसौंदर्य हा एकमेव घटक विवाह करताना कधीही पाहू नये.केवळ एखादी स्त्री खुप सुंदर आहे म्हणून एखाद्या पुरुषाने तिला पसंत करून तिच्याशी विवाह केल्यास तो मुर्ख असतो.विवाहासाठी स्त्रीचे संस्कार, स्वभाव, गुण, अवगुण तसेच तिची लक्षण यांबाबत माहिती घेण गरजेच आहे.त्यानंतरच स्त्रीला पसंत करावे.केवळ सुंदरतेच्या आधारावर पसंत केलेली स्त्री दुर्गुणी असल्यास वैवाहिक जीवनात पश्चातापाची वेळ येते.आचार्य चाणक्य यांच्या नीतिनुसार चांगले संस्कार असणारी स्त्री घराला स्वर्ग बनवते.तसेच पती व त्याच्या संपूर्ण घरातील लोकांची काळजी घेते.चाणक्यनीतिनुसार स्त्री सुंदर नसेल परंतु चांगल्या संस्काराची असेल तर पुरुषाला तिच्याशीच विवाह केला पाहिजे.कारण हीच स्त्री त्याच भविष्य सुखद बनविण्याबरोबरच त्याला उत्तम परिवार देऊ शकते.कुसंस्कारी स्त्री अधार्मिक असते.तिचा नात्यांवर विश्वास नसतो.ती सतत नात तोडण्याचा विचार करते.अशी स्त्री परिवाराच्या सुखापेक्षा स्वसुखाला महत्व देते.अशी स्त्री कुलनाश करते म्हणूनच विवाहासाठी संस्कारी स्त्री शोधावी.सुंदरता मनाची बघावी शरीराची नाही.