
दिग्दर्शकासोबत झोपण्याची चूक कधीही करू नका, ‘ सच कहू तो ‘ नीना गुप्ता
अभिनेत्री नीना गुप्ता तिच्या बोल्ड अंदाजामुळे नेहमीच चर्चेत असते. वेस्ट इंडीज क्रिकेटर वीव रिचर्डसोबतचे संबंध असोत की त्याच्यापासून झालेली मुलगी मसालामसाबा असो नीना गुप्ता नेहमीच चर्चेत राहिली आहे. सध्या नीना गुप्ता तीचे आत्मचरित्र ‘ सच कहू तो ‘ मुळे चर्चेत आहे. नीनाने १९८२ साली साथ साथ आणि गांधीसारख्या चित्रपटात लहान भूमिका करत मोठ्या पडद्यावर प्रवेश केला. नीनाने २०१८ साली वयाच्या ६० व्या वर्षी बधाई हो चित्रपटातील भूमिकेसाठी फिल्मफेअर पटकावला. आपल्या आत्मचरित्रात कास्टिंग काऊचबद्दल तीने मत मांडले असून कोणत्याही अभिनेत्रीने विवाहित दिग्दर्शक किंवा निर्मात्यासोबत संबंध ठेवू नयेत असे स्पष्ट मत मांडले आहे. तुमच्यासाठी तो आपल्या पत्नीला कधीही सोडणार नाही असेही तिने सांगितले आहे.
नीनाने स्वताचा भूतकाळ सांगताना सांगितले की, तीला प्रत्येक व्यक्तीच्या मीठी मारून व हात हातात घेऊन संवाद साधायची सवय होती. या सवयीमुळे एका दिग्दर्शकासोबत तिचे नाव जोडले गेले. अफवा उठल्या यामुळे दिग्दर्शकाची पत्नी अस्वस्थ झाली व तीने नीनाला घरी बोलवले आणि तिच्यावर गंभीर आरोप केले. नीनाने तिला समजवण्याचा प्रयत्न केला परंतु दिग्दर्शकाची पत्नी म्हणाली तुमच्यासोबतच अफवा कशा उठल्या? यात निश्चितच काही काळबेर आहे. तो कुटुंब वत्सल दिग्दर्शक या टीकेने त्रस्त झाला शिवाय त्याच घरगुती वातावरणही अस्वस्थ झाल.
नीनाने सांगितले या सर्वांचा परिणाम म्हणजे त्या दिग्दर्शकाने परत कधीही नीना गुप्तासोबत कधीही काम केले नाही.