युवकांची बांधणी करण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा सुपर १०० उपक्रम, मतदारसंघात जाऊन संघटन मजबूत करणार – महेबुब शेख

0

महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्रात आपल्या पक्ष संघटनेला अधिकाधिक प्रमाणात मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. महाराष्ट्रात “राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने सुपर १००” हा अनोखा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीची तयारी आत्ताच राष्ट्रवादीने नियोजपूर्वक हाती घेतल्याचे दिसून येत आहे.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. ते म्हणाले की “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक संघटन हे प्रत्येक मतदारसंघात मजबूत करण्याच्या हेतूने “राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने सुपर १००” हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. युवकांची बांधणी करण्याच्या हेतूने मा.ना.जयंत पाटील साहेब यांच्या मान्यतेने विधानसभा निरीक्षक पदी आज नवनिर्वाचित ३४ पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या. आदरणीय शरद पवार साहेबांच्या विचारांना जबाबदारीने मतदारसंघातील प्रत्येक युवकांच्या पर्यंत पोहचवाल हा विश्वास आहे”.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्रातील १०० मतदारसंघात युवकांची बांधणी करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विचार राज्यातील अधिकाधिक युवकांच्या पर्यंत पोहचवणे, स्थानिक पातळीवर जाऊन काम करणे, लोकांचे प्रश्न सोडवणे अशा कामगिरी या माध्यमातून करण्यात येणार आहेत.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.