राष्ट्रवादी कडून पुणे महानगरपालिकेचा निवडणूक पूर्व मास्टर प्लॅन, नवीन समाविष्ट गावांसाठी पदाधिकार्यांची नेमणूक!

0

महाराष्ट्र राज्य शासनाच्या आदेशानुसार पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या 23 गावावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विशेष लक्ष देण्याकडे सुरुवात झाली आहे. इतकेच नव्हे तर आगामी पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विशेष लक्ष देत आहे या तेवीस गावांमध्ये संपर्क साधण्यासाठी आणि समन्वयासाठी तेवीस पदाधिकाऱ्यांच्या नव्याने नेमणुका करण्यात आले आहेत.

तेवीस गावांचा महानगरपालिकेमध्ये समावेश झाल्याने दैनंदिन कामासाठी लोकप्रतिनिधींच्या संपर्काची आवश्यकता असते. मात्र या ठिकाणी संपर्क करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून २३ समन्वयक नेमण्यात आले आहेत. येथील प्रशासकीय यंत्रणा सुरळीत होईपर्यंत नागरिकांच्या अडी-अडचणी, समस्या हे पदाधिकारी जाणून घेणार आहेत. तसेच, प्रशासकीय समन्वय साधून नागरिकांच्या अडचणी सोडविण्यात येणार आहेत.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.