
मालेगाव मध्ये पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचा बैलगाडी मोर्चा!
केंद्र सरकार महागाई वरती कसलेही नियंत्रण ठेवत नाही पेट्रोल-डिझेलच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढले आहेत पेट्रोलचे दर कधीच शंभरी पार झाले आहेत. या वाढलेल्या महागाईच्या विरोधात मालेगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अनोखे आंदोलन करण्यात आले. या मागणीसाठी भाजप सरकार जबाबदार असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मालेगाव येथील जिल्हाध्यक्ष अॅड.रविंद्रनाना पगार यांनी केला आहे.
पेट्रोल डिझेल व घरगुती गॅसचा दरवाढीच्या निषेधार्थ नाशिक जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने मालेगाव येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर जिल्हाध्यक्ष अॅड.रविंद्रनाना पगार यांच्या नेतृत्वाने बैलगाडी मोर्चा काढण्यात आला होता.
त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकही भुल कमल का फुल, पेट्रोल डिझेलची दरवाढ मागे घ्या. यासोबतच पेट्रोल डिझेलचे भाव कमी झालेच पाहिजेत. अशा प्रकारच्या घोषणा देत केंद्र सरकारचा महागाईविरोधात निषेध व्यक्त केला.