‘मराठा समाजाला’ आरक्षण मिळावे म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेस ‘एक कोटी’ पत्र लिहिणार – महेबुब शेख

0

विकासाची कामे करत वाटचाल करणाऱ्या, औद्योगिक आणि शैक्षणिक भरारी घेणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज २२ वा वर्धापन दिन. या वर्धापन दिनाच्या निमित्ताने राज्यभरातून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याच दिवसाचे औचित्य साधून राष्ट्रवादी युवक काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींना मराठा आरक्षणाच्या मुद्यावर पत्र लिहिण्याची मोहीम हाती घेतली आहे.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांनी ट्विट करत एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्या ट्विट च्या माध्यमातून त्यांनी ही माहिती दिली आहे. ते म्हणाले की “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आज पर्यंत सर्व घटकांचा विचार केला आहे हाच विचार लक्षात घेत. उद्या १० जून रोजी पक्षाच्या २२ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने ‘मराठा समाजाला’ आरक्षण मिळावे म्हणून ‘एक कोटी’ पत्र लिहिण्याची मोहीम हाती घेत आहोत. युवकांच्या उज्वल भविष्यासाठी एक कोटी पत्र लिहीत आहोत. मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आपण पण “युवकांच्या उज्वल भविष्यासाठी एक पत्र” या मोहिमेत सहभागी व्हा”.

अशा आशयाचे त्यांनी ट्विट केले आहे. काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्रातील शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटी साठी गेले होते. उध्दव ठाकरे, अजित पवार आणि अशोक चव्हाण यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर नरेंद्र मोदींशी चर्चा केली. महाविकास आघाडी सरकार मराठा आरक्षणाच्या बाबतीत सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.