राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार पोट दुखीमुळे ब्रिच कँडी रुग्णालयात अॅडमीट

0

राज्यात सध्या कोरोना साथ पसरत असून राजकीय वातावरणही तापत आहे.मा यांचा कामाचा आवाका नेहमीच झपाट्याचा राहीला आहे.या वयातही शरद पवार सतत पक्ष, कार्यकर्ते यात व्यस्त असतात.कॅन्सरसारख्या व्याधीलाही पवार साहेबांनी लढवय्या विराप्रमाण तोंड दिले आहे.सध्या पवार साहेबांचे सातत्याने दौरे सुरू होते.दिल्ली,बारामती,मुंबई अशाप्रकारे त्यांचा दौरा सातत्याने चालू असतो.पवार साहेबांनी आहार नियंत्रणात आणून वजनही कमी केलेल आहे.

शरद पवार साहेब या वयातही आपल्या कामकाजात व्यस्त असतात.राजकारणात सक्रिय असलेले पवार साहेब पक्षाच्या बैठकी, कार्यकर्त्यांच्या समस्या, मंत्र्यांबाबतचे निर्णय, राज्य हितकारक निर्णय घेण्यासाठी सतत व्यस्त असतात.दरम्यान या सर्व दैनंदिन कामकाजात आरोग्य सांभाळण्याची कसरत करण अतिशय कठीण जात.

दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर मा शरद पवार यांच्या पोटात दुखु लागले परिणामी त्यांना ब्रिच कँडी रुग्णालयात अॅडमीट केले असून प्राथमिक तपासणीनंतर त्यांची एंडोस्कोपी केली गेली त्यात त्यांना पित्तशयाचा त्रास आढळून आला या त्रासात गाठ दिसून आली असून शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्याचे डॉक्टरांनी सांगितलं.31 मार्च नंतर शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.दरम्यान भाजपाचे नेते, चंद्रकांत दादा यांनी पवार साहेब लवकर बरे होवोत अशी भावना व्यक्त केली, तसेच शिवसेना नेत्या व मुंबईच्या महापौर किशोरीताई पेडणेकर यांनीही आई मुंबा देवाजवळ मी पवार साहेबांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत असल्याचे सांगितले.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.