राष्ट्रवादीकडून भगीरथ भालकेंना उमेदवारी!

0

राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर रिक्त असलेल्या पंढरपूर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून भगीरथ भालके यांना, तर भाजपकडून समाधान आवताडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून भगीरथ भालके विरुद्ध भाजपकडून समाधान आवताडे असा सरळ सामना रंगणार आहे. एकास एक उमेदवार समोर असल्याने सहानुभूतीच्या लाटेतही भाजपने महाविकास आघाडीसमोर तगडे आव्हान उभे केले आहे.

मंगळवारी समाधान आवताडे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी स्वत: विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यासह जिल्ह्यातील बड़े नेते हजेरी लावणार आहेत.

या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीकडून भगीरथ भालके यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मान्यतेने पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भगीरथ भारत भालके यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार घोषित करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादीचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विट करून दिली.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.