राष्ट्वादीचे आमदार निलेश लंके यांनी शरद पवारांच्या नावे उभ केल १०००बेडच दुसर कोविड सेंटर,सेंटरमध्ये रुग्णांच्या मनोरंजनाचीही सोय

0

पारनेरचे राष्ट्रवादी आमदार निलेश लंके यांनी स्थानिक पातळीवर प्रयत्न करत पारनेरमध्ये १०००बेडच दुसर कोविड सेंटर उभ केल आहे.यापूर्वीही मागील वर्षी निलेश लंके यांनी शरद पवार यांच्या नावे पारनेरमधील टाकळी ढाकेश्वर येथे पहिले १०००बेडच कोविड सेंटर उभ केल होत.या सेंटरमध्ये नाश्ता तसेच लोकांच्या करमणुकीसाठी करमणूक साधन ठेवली होती.

यावर्षीही कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता आमदार निलेश लंके यांनी पारनेर तालुक्यातील भाळवण येथे १०००बेडच सुसज्ज कोविड सेंटर उभारल आहे.येथे लोकांना औषधोपचाराबरोबर मोफत भोजनही मिळणार आहे.तसेच लोकांच मनोरंजन व्हाव यासाठी कॅरम बोर्ड तसेच इतर साधनही ठेवलेली आहेत.निलेश लंके यांनी लोकांनी घाबरून न जाता स्वताची काळजी घ्यावी अस आवाहनही केल आहे.

आमदार निलेश लंके यांनी उभ्या केलेल्या या हॉस्पिटलला समाजातील दानशुरांनी सढळ हस्ते मदत सुरू केली आहे.फळे,अंडी,भाजीपाला यांसह वाफ घ्यायच यंत्र यांचाही पुरवठा लोकांनी केला आहे.टिका,आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा आमदार स्थानिक पातळीवर काय करू शकतात याच उदाहरण निलेश लंकेंनी दिल आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.