शिर्डी साईबाबा देवस्थानवर राष्ट्रवादीच वर्चस्व, या आमदाराची अध्यक्ष म्हणून निवड

0

महाराष्ट्र सरकारने अधिकृत नावांची घोषणा केली असून या यादीत अहमदनगर जिल्ह्याला झुकते माप देण्यात आल्याचे दिसून येतंय. कोपरगाव तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आशुतोष काळे यांच्यासह अहमदनगर जिल्ह्यातील ९ जणांना विश्वस्त मंडळात संधी देण्यात आलीय तर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या जवळचे सहकारी राहुल कणाल यांनासुद्धा विश्वस्त पदाची लॉटरी लागलीय. दरम्या, आमदार आशुतोष काळे यांची शिर्डी संस्थानाच्या अध्यपदी निवड झाल्यानंतर कोपरगावमध्ये मोठ्या प्रमाणात जल्लोष सुरु आहे. आशुतोष काळे यांच्या समर्थकांकडून मतदारसंघात फटाके फोडून आनंद साजरा करण्यात येत आहे.

शिर्डी साईबाबा संस्थानाच्या विश्वस्त मंडळ जाहीर करण्यात आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आशुतोष काळे यांची साईबाबा संस्थानाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.तर जगदीश सावंत यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आलीय. १२ जणांचे विश्वस्त मंडळाचे गॅझेट काढून जाहीर केलं आहे. यात अहमदनगर जिल्ह्याला झुकते माप देण्यात आल्याचे दिसून येतंय.

शिर्डी देवस्थान नगर जिल्ह्यातील महत्वाचे धार्मिक केंद्र असून दरवर्षी लाखो भाविक दर्शनाला येत असतात. देवस्थान संस्थेचे अध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी आमदार आशुतोष काळे यांची निवड पक्षाला बळकटी देणारी ठरली आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.