आम्ही राष्ट्रवाद गंगेत मुडद्याच्या रुपात तरंगताना पाहिलाय, संजय राऊतांची भाजपवर जळजळीत टीका

0

भारतातील आरोग्य व्यवस्थेचे अक्षरशः जगभरामध्ये धिंडवडे निघाले आहेत. जगभरातून भारतातील आरोग्य व्यवस्थेबाबत टीका केली जात आहे. देशाचे पंतप्रधान आरोग्य व्यवस्थेकडे लक्ष द्यायचे सोडून निवडणूक प्रचारामध्ये व्यस्त होते; याच गोष्टीचे आज परिणाम देशाला भोगावे लागत आहेत. कित्येक लोकांचे मृत्यू झाले आहेत कित्येक कुटुंबे उद्ध्वस्त झाले आहेत.

गंगेत तरंगणाऱ्या प्रेतांना ऑक्सिजन किंवा लस मिळाली नाही. भाजपचे नेते म्हणतात त्याप्रमाणे कोरोना बरे करणारे गोमूत्र तरी त्यांना मिळायला हवे होते, अशी जळजळीत टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. आपण राष्ट्रवाद गंगेत मुडद्याच्या रुपात वाहताना आणि तरंगताना पाहिला. यामुळे भारताचा भेसूर चेहरा जगासमोर आला. तरीही भाजपकडून कोरोना असो किंवा चक्रीवादळ प्रत्येक संकटाचे राजकारण सुरुच आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

सामना वृत्तपत्रातून “रोखठोक” सदरातून संजय राऊत यांनी टीका केली आहे. देशातील देशातील परिस्थिती विषयक संजय राऊत यांनी परखडपणे भाष्य केले आहे सध्याच्या परिस्थिती मध्ये महत्वपूर्ण अशा गोष्टींकडे लक्ष द्यायचे सोडून भाजप नेते इतर विषयावर ती बोलत आहेत.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.