शरद पवारांना दिला रुग्णालयाने डिस्चार्ज

0

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरची दुसरी शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली असून, त्यांना आज रुग्णालयातून सोडण्यात आले आहे, तसेच त्यांची प्रकृती देखील ऊत्तम असल्याचे ट्विट पक्षाचे प्रवक्ते व अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केले आहे.

दरम्यान, शरद पवार यांना पोटदुखीच्या कारणामुळे ३० मार्च रोजी ब्रिच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. प्राथमिक तपासणीनंतर त्यांच्या पित्ताशयात खडे असल्याचं आढळलं आणि शस्त्रक्रिया करून त्यांच्या पित्ताशयामध्ये अडकलेला मोठा खडा बाहेर काढण्यात आला होता. एन्डोस्कोपीद्वारे ही शस्त्रक्रिया पार पडली होती. यानंतर 3 एप्रिल रोजी शरद पवारांना ब्रीच कॅन्डी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता.

मात्र, पुढच्या काही दिवसात त्यांच्यावर अजून एक शस्त्रक्रिया करून त्यांचे पित्ताशयही काढण्यात येणार असल्याची माहिती शरद पवारांवर उपचार करणारे डॉ. मायदेव यांनी दिली होती. त्यानंतर ७ दिवसांच्या कालावधीने पवारांना ११ एप्रिल रोजी पुन्हा ब्रिच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं आणि १२ एप्रिलला त्यांच्या पित्ताशयावर लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया करण्यात आली.

या शस्त्रक्रियेनंतर ब्रीच कँडी रुग्णालयात डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात असून, त्यांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती पक्षाचे प्रवक्ते व अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी ट्विट करून दिली आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.