
मास्क न लावता नवरदेव घोड्यावर ; पोलिसांनी दिला दंडाचा आहेर!
कोरोणाची परिस्थिती जरी महाराष्ट्रात हातामध्ये आलेली असली, तरीही कोरणा संपलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी शक्य असणाऱ्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे गर्दीच्या ठिकाणी मास्क लावलेच पाहिजे. मात्र नागरिक कोरोणाच्या बाबतीत हलगर्जीपणाने वागतांना दिसून येतात ही गोष्ट आरोग्याच्या दृष्टीने योग्य नाही.
कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेत सर्वत्र मास्क घालणे बंधनकारक करण्यात आलं आहे. मास्क न घालणाऱ्या नागरिकांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई देखील करत आहे. मात्र एका नवरदेवाने वरातीमध्ये मास्क न लावल्याने त्याला दंडाचा आहेर पोलिसांकडून देण्यात आला आहे.
ही घटना नागपुर मधील नेहरू नगर येथील लग्न समारंभामध्ये पडली. नवरदेव घोड्यावरती बसलेला होता. त्याच्यासोबत काही पाहुणे मंडळी सुद्धा होती. अशावेळी नवरदेवाने मास्क चेहऱ्याला लावलेला नव्हता. यामुळेच नागपूर मनपाच्या अधिकाऱ्यांनी या नवरदेवाला दंड ठोठावला आहे. वरातीत सहभागी झालेल्या मंडळींवर देखील मास्क न लावल्यामुळे दंडात्मक कारवाई करुन दंड वसूल करण्यात आला आहे.