
राष्ट्रवादी महिला काँग्रेस महागाई वरून केंद्र सरकारच्या विरूद्ध सोशल मीडियावर आक्रमक!
सध्याच्या परिस्थिती मध्ये एकीकडे आड आणि एकीकडे विहीर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. एकीकडे कोरोना ने लोकांची आर्थिक स्थिती खराब केली आहे तर दुसरीकडे वारंवार वाढत असलेली महागाई याने चांगलेच जनतेचे कंबरडे मोडले आहे. अशाच मध्ये राष्ट्रवादी महिला काँग्रेस वाढत्या महागाई वरून आक्रमक झाली आहे. महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांनी ट्विटर वरती ट्रेण्ड घेतला आहे.
मोठ्या संख्येने आपल्या कौटुंबिक अडचणी, महागाई मुळे होणारे हाल अशा गोष्टी महिला ट्विटर वरती मांडत आहेत. असेच प्रश्न विचारत महिला आज ट्विटर वरती आक्रमक झाल्या आहेत. #मोदीहैतोमहंगाईहै या ट्रेण्ड खाली सगळ्या महिला एकत्रित होत केंद्र सरकारला महागाई बद्दल प्रश्न विचारताना दिसत आहेत. या ट्रेण्ड ला मोठ्या प्रमाणात लोकांचा प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
राष्ट्रवादी महिला काँग्रेस सतत विविध आंदोलने करत जनतेचे प्रश्न सातत्याने मांडत असते. रुपाली चाकणकर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला एकत्रित येत नावीन्यपूर्ण रित्या सोशल मीडियावर सक्रिय होते आज प्रश्न विचारत आहेत!