राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पित्ताशयावरील शस्त्रक्रिया यशस्वी

0

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पित्ताशयावरील शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आहे. पोटदुखीच्या त्रासामुळं त्यांना मंगळवारी रात्री ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथं काल रात्री उशिरा त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

दरम्यान शरद पवार यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आणि त्यांना रुग्णालयात दाखल केल्यावर अनेकांनी त्यांच्या प्रकृतीविषयक अपमानास्पद टिपण्णी केली होती. अनेकांनी त्यांची खिल्ली उडवणाऱ्या पोस्ट देखील केल्या होत्या. यात देवेंद्र फडणवीसांच्या माजी प्रसिद्धीप्रमुखाचा देखील समावेश होता. जितेंद्र आव्हाड यांनी आशा विकृतांचा सोशल मीडियावर खरपूस समाचार घेतला होता.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सोशल मीडियावर पवार साहेबांवर करण्यात आलेल्या विकृत टीका टिपण्णीचे गांभीर्य लक्षात घेऊन आशा लोकांची यादी बनवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या सर्व लोकांच्या वादग्रस्त पोस्ट आणि कमेंट्सचा आधार घेऊन या सर्व लोकांवर कुठल्या प्रकारची कायदेशीर कारवाई करता येईल का? याची पडताळणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सोशल मीडिया टीम करत आहे.

एकीकडे सर्वपक्षीय नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी शरद पवारांना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्याचा शुभेच्छा दिल्या असताना समाज माध्यमांवर काही विकृत मानसिकतेच्या लोकांकडून पवारांच्या आजारपणाविषयी करण्यात येणारी टीका व टिप्पणी ही फार दुर्दैवी असल्याचे व अशा विकृतांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सोशल मीडिया पदाधिकाऱ्यांनी मांडली आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.